Corona vaccine Kolhapur- जिल्ह्यात उच्चांक ! ३७ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:14 AM2021-04-06T11:14:30+5:302021-04-06T11:16:34+5:30
Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ हजार ८७ नागरिकांनी लस घेतली असून, आतापर्यंतचा हा उच्चांक समजला जातो. २ एप्रिल रोजी २८ हजार नागरिकांनी लस घेतली होती. त्याहीपुढे जात ९ हजारांहून अधिक नागरिकांनी सोमवारी लस घेतली.
जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ९९ टक्के आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. यामध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ११८ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. ६० वर्षांवरील ४९ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.
वयाच्या ४५ वर्षांनंतरच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय उशिरा घेण्यात आला. १ एप्रिलपासून हा निर्णय घेण्यात आला. परंतु दोन एप्रिलपासून खऱ्या अर्थाने लसीकरण सुरू झाले. यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व यंत्रणांना जबाबदारी देऊन स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुराव्यासाठी काही तालुके वाटून दिले. परिणामी आता सर्वत्र लसीकरणाने वेग घेतला आहे.
- पहिला लस घेतलेले नागरिक ४ लाख ३१ हजार ४१९
- दुसरा डोस घेतलेले नागरिक २७ हजार ८४२