यंदा ‘आयटीआय’ला गेल्या वर्षीपेक्षा जादा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:14+5:302021-08-26T04:27:14+5:30

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला ...

More applications to ITI this year than last year | यंदा ‘आयटीआय’ला गेल्या वर्षीपेक्षा जादा अर्ज

यंदा ‘आयटीआय’ला गेल्या वर्षीपेक्षा जादा अर्ज

Next

अकरावी, बारावीच्या शिक्षणाच्या तुलनेत आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास कमी खर्च येतो. कोविडमध्ये अनेकांच्या हातचे काम गेले तर कोणाला पगार कपातीला सामोरे जावे लागले. या दोन्ही परिस्थितीत हातात कला असणाऱ्या मात्र फारशी अडचण आली नाही. एक, दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एखादे कौशल्य प्राप्तीबरोबरच हाताला रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील अधिकतर विद्यार्थ्यांचे आयटीआयमध्ये प्रवेशित होण्याला अधिक प्राधान्य आहे. त्यामध्ये विद्यार्थिनींचे प्रमाणही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याने यंदाच्या अर्जांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

पॉईंटर

जिल्ह्यातील शासकीय आयटीआय : १२

एकूण प्रवेश क्षमता : ३२५२

खासगी आयटीआय : ३९

एकूण प्रवेश क्षमता : ३२०४

आतापर्यंत आलेले अर्ज : ११ हजार

चौकट

गेल्यावर्षी पेक्षा चांगले चित्र

गेल्यावर्षी जिल्ह्यातील आयटीआयसाठी ८९०० विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. यावर्षी आतापर्यंत ११ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे यंदा चांगले चित्र आहे.

प्रतिक्रिया

म्हणून वाढले आयटीआयचे विद्यार्थी

कमी खर्चात रोजगाराभिमुख शिक्षण मिळत असल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. निदेशकांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रमांची माहिती दिली जात आहे.

-आर. एस. मुंडासे, प्राचार्य, शासकीय आयटीआय कळंबा

आयटीआयमधील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनेक संधींची दारे खुली होतात. कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे अधिक ओढा आहे.

- विलास सोनवणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

विद्यार्थी म्हणतात

आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगारासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. त्यामुळे आयटीआयमधील प्लंबिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार आहे.

-स्वप्नील पोवार, जाधववाडी

Web Title: More applications to ITI this year than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.