नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:31+5:302021-06-05T04:19:31+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ...

More discharged than new patients | नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्यांची संख्या अधिक

नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्यांची संख्या अधिक

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १६०४ नागरिक पॉझिटिव्ह आले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील मृतांचा आकडा गुरुवारी कमी आला होता; परंतु शुक्रवारी तो पुन्हा वाढला. अजूनही कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी येत नाही. कोरोनावर नियंत्रण करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून जादा चाचण्या करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ७७१ इतकी असून, रोजची डिस्चार्जची संख्या वाढत असल्याने ही रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

कोल्हापूर शहरात ४०७, करवीर तालुक्यात ३०६, हातकणंगले तालुक्यात ११० नवे रुग्ण आढळले असून, कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावर मृतांची संख्या

कोल्हापूर शहर ०६

जरगनगर, बापट कॅम्प, गारगोटी रोड, राजारामपुरी, फुलेवाडी, आर. के. नगर

करवीर ०६

कळंबा, कळंबे तर्फ कळे, शिंगणापूर, खटांगळे, कंदलगाव, दऱ्याचे वडगाव

गडहिंग्लज ०४

खणदाळ, औरनाळ, करंबळी, घावण गडहिंग्लज ०४

खणदाळ, औरनाळ, करंबळी, घावणे

इचलकरंजी ०३

महासत्ता चौक, कोल्हापूर नाका, नेहरूनगर

हातकणंगले ०३

नरंदे. कबनूर, शिरोली पुलाची

राधानगरी ०२

धामोड, कौलव

पन्हाळा ०२

पोर्ले, राक्षी

शाहूवाडी ०१

पेंडखळे

चंदगड ०१

कोवाड

शिरोळ ०१

उदगाव

कागल ०१

कुरुकली

इतर ०४

नेर्ली, सातारा, निपाणी, चिक्कोडी

Web Title: More discharged than new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.