कुराण पठणासह दानधर्मावर अधिक भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:46 AM2018-05-20T00:46:06+5:302018-05-20T00:46:06+5:30
पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली असून, त्याकरिता बाजारात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल वाढली
कोल्हापूर : पवित्र रमजान महिन्याचे रोजे सुरू झाले आहेत. या महिन्यात लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली असून, त्याकरिता बाजारात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल वाढली आहे. यात टोपी, अत्तर, ओढणी, रुमाल, खजूर यांचा समावेश आहे.
या पवित्र महिन्यात कुराणाचे पठण महत्त्वाचे मानले जाते. यासह गरजू मुस्लिम बांधवांना ‘जकात’च्या स्वरूपात दान हेही तितकेच महत्त्वाचे मानले आहे. त्यानुसार हे बांधव गरजू शेजारी, गल्लीतील, गावातील व अन्य धर्मीयांना कुवतीनुसार मिळणाºया उत्पन्नातून दान करतात. जर १०० रुपये मिळत असतील तर त्यांतील अडीच रुपये दान केले जातात. यासह ज्यांच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन्न किलो चांदी अथवा जादाची स्थावर मालमत्ता आहे, अशा मुस्लिम बांधवांनी गरजंूना जकात दिली पाहिजे, असा अलिखित नियम आहे. या काळात पवित्र महिन्यासाठी लागणाºया वस्तूंचीही रेलचेल मोठ्या प्रमाणात होते. देशी बनावटीसह परदेशीही वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कुराण, शरिफा, हादीस, तसबी, सुरमा, अत्तर, मिसवाक, टोपी, रिहाल यांचा यात समावेश आहे.
या वस्तूंना मागणी अधिक
टोपी - सूफी, अफगाणी, चायनीज, तैवानी, तुर्की, इंडोनेशियन, सुदानी, हकाणी.
स्टोल (ओढणी) - डायमंड, नेट, चायना, कॉटन प्रिंटेड, जुगनू, मूनलाईट.
अत्तर - यूएई, अमिरात, अल रिहाब, अल फलक, मीना, अल नईम, अलमास, आदी.
रुमाल - अरबी रुमाल, गौंडा, झालर, टायगर रुमाल, मौलाना रुमाल, दुवा रुमाल, साफाह, आदी.
कुराण - कुराण काब्याच्या आकर्षक पेटीच्या स्वरूपात आले असून, विविध आकारांनुसार ९५० ते १८०० रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत.
खजूर - अगदी साधे, जायदी, अफगाणी, आदी परदेशी खजुरांना मागणी अधिक आहे. त्यांच्या किमतीही ६० ते ५०० रुपये किलोपर्यंत उपलब्ध आहेत.
दिवसभरात ३२ पाºयाचे एक किंवा दीड भाग वाचन करणेही गरजेचे मानले जाते.
कुराण, हादिस, तसबी, सुरमा, अत्तर, मिसवाक, टोपी, रिहाल या वस्तूंना मोठी मागणी आहे. यात देशीसह परदेशी वस्तूंची रेलचेल बाजारपेठेत अधिक आहे. कुराणातही नवीन काब्याच्या आकारात कुराणपेट्या आल्या आहेत. त्यांनाही मागणी अधिक आहे.
- महंमद मुल्ला, साहित्य विक्रेते