संशोधनाधारित उत्तम प्रकाशने अधिक प्रमाणात निर्माण व्हावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:31+5:302021-03-25T04:24:31+5:30

विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन यांनी लिहिलेल्या ‘बिझनेस कॉरस्पाँडंट मॉडेल अँड इट्स रोल इन ...

More good research-based publications should be produced | संशोधनाधारित उत्तम प्रकाशने अधिक प्रमाणात निर्माण व्हावीत

संशोधनाधारित उत्तम प्रकाशने अधिक प्रमाणात निर्माण व्हावीत

googlenewsNext

विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन यांनी लिहिलेल्या ‘बिझनेस कॉरस्पाँडंट मॉडेल अँड इट्स रोल इन बँकिंग सेक्टर’ या प्रासंगिक शोधनिबंधाच्या पुस्तिकेच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. व्यवसायदूतांच्या (बिझनेस कॉरस्पाँडंट) नियुक्तीमुळे बँकांच्या व्यवसायाभिमुखतेसह स्थानिक रोजगाराभिमुखतेला बळ लाभले आहे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ए.एम. गुरव उपस्थित होते. प्रा. महाजन यांनी प्रास्ताविक केले. के. व्ही. मारूलकर यांनी आभार मानले.

चौकट

व्यवसायदूत संकल्पना महत्त्वाची

आंतरराष्ट्रीय, खासगी बँकांचे जाळे देशभरात विस्तारताना ग्रामीण भारताच्या आर्थिक सबलीकरणासाठी व्यवसाय दूत ही संकल्पना महत्त्वाची ठरली आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आदी सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत बँकेच्या सेवांचे लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने ही चळवळ उपयुक्त आहे. त्याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.

फोटो (२४०३२०२१-कोल-पुस्तक प्रकाशन) : शिवाजी विद्यापीठात बुधवारी ‘बिझनेस कॉरस्पाॅडंट मॉडेल ॲन्ड इट्स रोल इन बँकिंग सेक्टर’ या प्रासंगिक शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. यावेळी डावीकडून के. व्ही. मारुलकर, पी. एस. पाटील, एस. एस. महाजन, विलास नांदवडेकर, ए. एम. गुरव उपस्थित होते.

Web Title: More good research-based publications should be produced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.