मोरे, कामत रिंगणात
By admin | Published: September 16, 2014 12:34 AM2014-09-16T00:34:20+5:302014-09-16T00:35:40+5:30
घुमान : साहित्य संमेलनाध्यक्षपदावरुन वाद
पुणे/कोल्हापूर : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी पुण्यात अर्ज दाखल केला तर डॉ. अशोक कामत यांनी कोल्हापूरमध्ये उमेदवारी जाहीर केली.
साहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते, परंतु प्रक्रिया सुरू झाली असून पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल,असे मत डॉ. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यांनी सोमवारी पुण्यातील साहित्य परिषदेच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. घुमानचे संमेलन हे सांस्कृतिकदृष्ट्या, राष्ट्रीयदृष्ट्या ऐतिहासिक आहे. संत साहित्याशीच नव्हे तर मराठी साहित्यातील प्रत्येक प्रवाहात त्यांचा संदर्भ आहे. सांस्कृतिक निवडणुका या राजकारणातील निवडणुकांप्रमाणे नसाव्यात यासाठी मोरे यांना पाठिंबा दिल्याचे सूचक असलेले डॉ. सबनीस म्हणाले. मोरे यांना प्रकाशक परिषदेचा नव्हे तर माझा वैयक्तिक पाठिंबा असल्याचे अनुमोदक अरूण जाखडे यांनी सांगितले. प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळातील वादावर तोडगा काढण्यासाठी वात्रटिकाकार
रामदास फुटाणे प्रयत्नशील आहेत, त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
निवडणूक बिनविरोध व्हावी
साहित्य संमेलनाची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते, परंतु आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल.
- डॉ. सदानंद मोरे
माघार नाही..
सदानंद मोरे यांच्याशी माझे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. संमेलनाध्यक्षपद निवडणुकीतूनच निवडले जाते. मी कुणाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बरोबरीने निवडणुकीसाठी उभा आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही.
- डॉ. अशोक कामत