‘गर्जन’च्या शाळेला नवे रूप देण्यास सरसावले हात ; ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद : दिवसभरात लाखाहून अधिक निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:46 AM2018-02-16T00:46:04+5:302018-02-16T00:48:28+5:30
कोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाºया पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेल्या करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेला आता नवे रूप मिळणार आहे. ‘लोकमत’च्या आवाहनानंतर
कोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेल्या करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेला आता नवे रूप मिळणार आहे. ‘लोकमत’च्या आवाहनानंतर गुरुवारी समाजातून आर्थिक पाठबळाचा ओघ सुरू झाला आणि यात एकाच दिवसात लाखांहून अधिकचा निधी उपलब्ध झाला आहे.
गुणवत्तेच्या जोरावर ‘गर्जन’ शाळेने वेगळा ठसा उमटविला आहे. शालेय पातळीवरील कोणत्याही स्पर्धेत अव्वल स्थानी राहणाºया या शाळेची भौतिक सुविधांच्या डळमळीत पायावर वाटचाल सुरू आहे. कष्टकरी, मजूर आणि सर्वसामान्य पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी आधार असलेल्या या शाळेला समाजातून काही मदत मिळावी, यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या शाळेबाबतचे वास्तव ‘लोकमत’ला सांगितले.
यावर ‘लोकमत’ने गुरुवारी ‘सामाजिक संस्थांच्या दातृत्वाने बहरेल ‘गर्जन’ची शाळा’ या वृत्तातून या शाळेच्या गुणवत्तेवर प्रकाशझोत टाकला. त्यासह शाळेला आवश्यक असणाºया भौतिक सुविधांबाबत मदतीचा हात देण्याचे आवाहन केले.
त्यास प्रतिसाद म्हणून अनेक सामजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी अगदी व्यक्तिगत पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देण्याचे ‘लोकमत’कडे कळविले. आम्ही मदत करतो, काम उभे राहू दे मग आमची नावे जाहीर करा, असे या मान्यवरांचे म्हणणे होते.
डॉ. संजय डी. पाटील यांचा पुढाकार
‘लोकमत’च्या कोणत्याही उपक्रमास पाठबळ देणाºया डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी हे वृत्त वाचून शाळेला एक लाखापर्यंतची कोणतीही मदत करणार असल्याचे सांगितले. मुलींसाठी स्वच्छतागृह, शाळेस संगणक, सुसज्ज ग्रंथालय यापैकी शाळेची सर्वांत निकडीची गरज असेल तरी पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी आजच शुक्रवारी प्राचार्य के. टी. जाधव यांना प्रत्यक्ष त्या शाळेला भेट देण्यास पाठविणार आहे. ते पाहणी करून आल्यानंतर काय मदत करायची याचा निर्णय घेऊ, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. पाटील यांचा रविवारी वाढदिवस आहे, ते शाळेला मदत करून तो अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहेत.
सहजपणे ‘गर्जन’ या गावामध्ये जाण्याचा योग आला. यावेळी तेथील या गुणवत्तापूर्ण शाळेला भौतिक सुविधा नसल्याचे समजले. तिला समाजाच्या मदतीचा हात मिळाला तर या परिसरातील गोरगरिबांच्या शिक्षणाचा आधार भक्कम होईल, असा विचार मनात आला. याबाबत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांना ‘गर्जन’ शाळेचा विषय सांगितला. या शाळेला पाठबळ देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत ‘लोकमत’चे आभार व्यक्त करतो.
- सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
बैठक घेऊन निर्णय
या शाळेला काय मदत हवी याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची बैठक घेऊन शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर उपलब्ध होणारा निधी व त्यातून करावयाची कामे यांचे नियोजन केले जाणार आहे.