बुवाचे वाठारच्या विकासासाठी एक कोटीहून अधिक निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:31+5:302021-02-15T04:21:31+5:30
खोची : विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी बुवाचे वाठार ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. या गावातील विकासाचे एकही काम प्रलंबित ...
खोची : विधानसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी बुवाचे वाठार ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. या गावातील विकासाचे एकही काम प्रलंबित ठेवणार नाही. ग्रामस्थांनी विकासासाठी निधी मागायचा, तो देण्याची जबाबदारी माझी आहे. या गावासाठी ८५ लाखांचा निधी दिला आहे. नजीकच्या काळात आणखी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन आमदार राजू आवळे यांनी दिले.
बुवाचे वठार येथे कुंभोज ते बुवाचे वाठार रस्ता, ओढ्यावर साकवपुलाचे भूमिपूजन व गावातील अंतर्गत रस्त्यांंच्या कामांंचा प्रारंभ व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. निवेदिता माने होत्या. शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव, पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.
माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, ग्रामपंचायतीला निवडून आलेल्या सदस्यांनी विकासाची भरपूर कामे केली पाहिजेत. खासदार धैर्यशील माने यांच्या निधीतून सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी सहकार्य केले जाईल.
यावेळी डॉ. प्रदीप पाटील, उपसरपंच शंकरराव शिंदे, सरपंच रिना शिंदे, अरुण कांबळे, प्रा. बी.के. चव्हाण यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव, सपना पांडव, प्रतापराव देशमुख, खोचीचे सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, सुरेश शिर्के, मदन अनुसे उपस्थित होते.
फोटो : १४ बुवाचे वाठार विकासकाम
-बुवाचे वठार येथे आमदार फंडातील विकासकामांचे उद्घाटन आमदार राजू आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती डॉ. प्रदीप पाटील शंकरराव शिंदे, मदन अनुसे, शोभा शिंदे, सरपंच रिना शिंदे, मदन अनुसे उपस्थित होते.
(छाया : विजय चौगुले)