कोविशिल्डचे एक लाखापेक्षा अधिक डोस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:48+5:302021-07-27T04:26:48+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवारी कोविशिल्डचे सुमारे १ लाख ४ हजार डोस उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून ...

More than one lakh doses of Covishield available | कोविशिल्डचे एक लाखापेक्षा अधिक डोस उपलब्ध

कोविशिल्डचे एक लाखापेक्षा अधिक डोस उपलब्ध

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोमवारी कोविशिल्डचे सुमारे १ लाख ४ हजार डोस उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पाणी, पेट्रोलपाठोपाठ डोस घेण्यासाठी लागणाऱ्या रांगा त्यामुळे आज मंगळवारपासून कमी होण्याची शक्यता आहे.

प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसींचा कोटा ठरविण्यात आला आहे. संबंधितांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तालुकानिहाय वाटप : आजरा - ४ हजार १२०, भूदरगड - ४ हजार ४३०, चंदगड - ६ हजार १०, गडहिंग्लज - ७ हजार ७००, गगनबावडा - १ हजार १००, हातकणंगले - २१ हजार ६९०, कागल - ५ हजार ९४०, करवीर - ११ हजार १२०, पन्हाळा - ६ हजार १०, राधानगरी - ६ हजार २९०, शाहूवाडी - ५ हजार २१० तर शिरोळ तालुक्यासाठी १० हजार ६० डोस प्राप्त झाले आहेत. सीपीआर रुग्णालयासाठी १ हजार, सेवा रुग्णालय (कसबा बावडा) २ हजार तर कोल्हापूर महानगरपालिका ११ हजार ३२० असे एकूण १ लाख ४ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

Web Title: More than one lakh doses of Covishield available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.