corona virus Updates In Kolhapur : नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 07:31 PM2021-07-19T19:31:51+5:302021-07-19T19:34:39+5:30

corona virus Updates In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ११५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १२१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

More patients recover than new patients | corona virus Updates In Kolhapur : नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

corona virus Updates In Kolhapur : नव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक११५८ नवे रूग्ण तर २३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर  : जिल्ह्यात ११५८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून २३ जणांचा मृ़त्यू झाला आहे. तर १२१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १३ हजार ४४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर शहरातील २१२ नागरिकांना कोरोना झाला असून करवीर तालुक्यातील २०४ जणांचे अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. करवीर, हातकणंगले आणि कागल तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याचे सोमवारी आकडेवारीवरून दिसून आले.

कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी चौघांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला असून आजरा तालुका आणि इचलकरंजीतील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. १४ हजार १२४ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ११५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आता चार वाजेपर्यंत सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याने परिस्थितीमध्ये काय फरक पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तालुकावार मृत्यू

  • कोल्हापूर ०४

लाईन बाजार, लक्षतीर्थ वसाहत, कसबा बावडा, सुर्वेनगर

  • करवीर ०४

देवाळे, जठारवाडी, बहिरेश्वर, सरनोबतवाडी

  • आजरा ०३

आजरा, मुमेवाडी, कागिनवाडी

  • इचलकरंजी ०३
  • शिरोळ ०२

टाकवडे, जैनापूर

  1. गडहिंग्लज ०२

भडगाव, नूल

  • पन्हाळा ०२

पन्हाळा, बोरगाव

  • हातकणंगले ०१

सावर्डे

  • कागल ०१

रणदिवेवाडी

  • इतर जिल्हा ०१

हडलगे
 

Web Title: More patients recover than new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.