Kolhapur News: कणेरी मठावर ५० हून अधिक गाईंचा मृत्यू, शुभमंगल पंचमहाभूत लोकोत्सवात उडाली खळबळ
By समीर देशपांडे | Updated: February 24, 2023 13:11 IST2023-02-24T13:09:57+5:302023-02-24T13:11:03+5:30
शुभमंगल पंचमहाभूत लोकोत्सवातून धक्कादायक घटना समोर आली

Kolhapur News: कणेरी मठावर ५० हून अधिक गाईंचा मृत्यू, शुभमंगल पंचमहाभूत लोकोत्सवात उडाली खळबळ
कोल्हापूर : कोल्हापुरातील कणेरी मठावर सुरु असलेल्या शुभमंगल पंचमहाभूत लोकोत्सवातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मठावर पन्नासहून अधिक गाईंचा अचानक मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. काल, गुरुवारी दुपारपासून हा प्रकार घडला असून आज, शुक्रवारी (दि.२४) ही बाब उघडकीस आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या लोकोत्सवाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गुरुवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद्र गहलोत मठावर होते. या दरम्यान या प्रकाराला सुरुवात झाली. मठावर हजारोंच्या संख्येने गायी असून सध्या जनावरांचे प्रदर्शन सुरू असल्यामुळे ही मोठ्या संख्येने जनावरे आणण्यात आली आहेत.
आतापर्यंत बारा गाईंचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांनी दिली. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती फॉरेन्सिक कडून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.