अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची शासन निधीतून सहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:21 PM2019-11-12T13:21:21+5:302019-11-12T13:24:48+5:30

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमधील २६ हजार २५0 विद्यार्थ्यांना जिल्ह्यांतर्गत आणि परराज्यामध्ये सहलीसाठी नेण्यात येणार आहे; त्यासाठी परिषदेने दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

More than two and a half thousand students traveled through the Government Fund | अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची शासन निधीतून सहल

अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची शासन निधीतून सहल

Next
ठळक मुद्देअडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची शासन निधीतून सहलएक सहल राज्यात, तर दुसरी परराज्यात

समीर देशपांडे

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमधील २६ हजार २५0 विद्यार्थ्यांना जिल्ह्यांतर्गत आणि परराज्यामध्ये सहलीसाठी नेण्यात येणार आहे; त्यासाठी परिषदेने दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये या सहली नेण्यात येणार आहेत. या दोन प्रकारच्या सहली होणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातून ६५0 विद्यार्थ्यांना शेजारील जिल्ह्यातील उत्तम शिक्षण संस्था, विज्ञान केंद्रे, वस्तू संग्रहालय, प्राणी संग्रहालय, तारांगण, वारसा इमारती अशा ठिकाणी भेटी द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशा पद्धतीने राज्यभरातून २२७५0 विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी २00 रुपये याप्रमाणे ४५ लाख ५0 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सहलीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून १00 विद्यार्थी परराज्यातील प्रमुख संस्था व माहिती स्थळांना नेण्याविषयीच्या सूचना आहेत; त्यासाठी प्रतिविद्यार्थी तीन हजार रुपये असे राज्यभरातील ३५00 विद्यार्थ्यांसाठी एक कोटी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ज्या शाळांची अध्ययन निष्पत्ती सर्वोत्तम आहे, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांची आणि त्यातही ५0 टक्के विद्यार्थिनींची निवड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे अनुकरण

याआधी कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इस्त्रोला नेण्याची योजना यशस्वी केली होती. त्याच धर्तीवर आता शिक्षण परिषदेने या सहलींचे आयोजन केले आहे.

जिल्हा परिषदेचे याआधीचे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आणि योजना राज्यपातळीवर घेतले गेले आहेत. आम्ही जाणीवपूर्वक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्त्रो, आयुका यांसारख्या संस्थांना नेण्याची योजना आखली होती. याच पद्धतीने ही योजना राज्यात राबविली जाते, याचा आनंद आहे.
अंबरिश घाटगे
सभापती, शिक्षण व अर्थ समिती, कोल्हापूर

Web Title: More than two and a half thousand students traveled through the Government Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.