Crime News kolhapur: बँकेत बनावट सोने ठेवून उचलले तारण कर्ज, १३ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:04 PM2022-06-15T14:04:56+5:302022-06-15T14:08:19+5:30

कर्जदार व तारण कर्जासाठी असणारे व्हॅल्युएटर तांबे यांनी संगनमत करुन बनावट सोने ठेवले

Mortgage loan taken by keeping fake gold in bank, fraud of Rs 13 lakh in kolhapur | Crime News kolhapur: बँकेत बनावट सोने ठेवून उचलले तारण कर्ज, १३ लाखांची फसवणूक

Crime News kolhapur: बँकेत बनावट सोने ठेवून उचलले तारण कर्ज, १३ लाखांची फसवणूक

Next

कोल्हापूर : कर्जदार व मूल्यनिर्धारक (व्हॅल्युएटर) यांनी संगनमत करून बँकेत बनावट सोने ठेवून सुमारे १३ लाख ४३ हजार २४६ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांची नावे अशी- संतोष भालचंद्र तांबे (रा. अनंत अपार्टमेंट, राजारामपुरी ८ वी गल्ली, टाकाळा), सचिन सुरेश सुतार (रा. लक्षतीर्थ वसाहत), राजू तानाजी जाधव (रा. लाड चौक, शिवाजी पेठ), यतीन कुमार वाडकर (श्रीराम विद्यालयनजीक, राजारामपुरी), सुहास साताप्पा मोहिते (रा. शिवगंगा कॉलनी, मोरे मानेनगर), अनिकेत बळवंत कदम (यवलूज, ता. पन्हाळा), प्रकाश विष्णू बुचडे (रा. संभाजीनगर, यवलूज, ता. पन्हाळा), दिलीप गंगाराम चौगले (रा. खोपडेवाडी, ता. गगनबावडा), सागर रामचंद्र दवडते (रा. फुलेवाडी), अभिषेक किशोर पाटील (रा. शिवगंगा अपार्टमेंट, मोरेमानेनगर), शुभम विश्वास जाधव (रा. खांडसरी वसाहत, बालिंगा, नागदेववाडी, ता. करवीर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जना स्मॉल बॅंक लि., शाखा संभाजीनगर येथे बॅंकेत सोने तारण कर्ज प्रकरणामध्ये तारण सोन्याची सत्यता व व्हॅल्युएशनकरिता संतोष तांबे यांची नियुक्ती केलेली होती. दि. २८ ऑक्टोबर ते दि. ८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वेळोवेळी जना स्मॉल बॅंकेच्या संभाजीनगर शाखेत कर्जदार व तारण कर्जासाठी असणारे व्हॅल्युएटर तांबे यांनी संगनमत करुन सोने तारण कर्जासाठी बनावट सोने ठेवले. त्यावर सोने तारण कर्ज प्रकरण मंजूर करून बॅंकेतून १६ लाख ३३ हजार ३२५ रुपयांची उचल केली.

त्यापैकी २ लाख ८७ हजार ०७९ रुपये इतकी रक्कम सोने तारण कर्जासाठी परत भरली. उर्वरित १३ लाख ४६ हजार २४६ रुपये भरणा केला नाही. त्यानुसार बॅंकेची फसवणूक केली. त्याबाबत अनिस सिकंदर पठाण (रा. सर्किट हाऊस, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्याबाबत व्हॅल्युएटर व कर्जदार अशा एकूण ११ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Mortgage loan taken by keeping fake gold in bank, fraud of Rs 13 lakh in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.