बहुतांश उमेदवारांनी साधला धनत्रयोदशीचा मुहूर्त

By admin | Published: October 29, 2016 01:16 AM2016-10-29T01:16:39+5:302016-10-29T01:18:22+5:30

नगरपालिका निवडणूक : अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उसळणार गर्दी; आॅफलाईनची परवानगी

Most of the candidates opted for Dhanteras | बहुतांश उमेदवारांनी साधला धनत्रयोदशीचा मुहूर्त

बहुतांश उमेदवारांनी साधला धनत्रयोदशीचा मुहूर्त

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा नगरपालिका व तीन नगरपरिषदांसाठी होणाऱ्या निवडणुकीची चुरस
वाढत असून, बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधला. जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी ४८४, तर नगराध्यक्षपदासाठी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. आज, शनिवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. दिवाळी असली तरी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून, या प्रक्रियेबाबत संभ्रम दिसत होता; परंतु निवडणूक आयोगाने उमेदवारांची अडचण लक्षात घेऊन शुक्रवारी आॅफलाईन अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक १३१ अर्ज दाखलगडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये पाचव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवकपदासाठी ९९ अर्ज
दाखल झाले. शुक्रवारअखेर नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ, तर नगरसेवकपदासाठी १३१ अर्ज दाखल झाले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी जनता दलाच्या प्रा. स्वाती कोरी, राष्ट्रवादीचे किरण कदम, भाजपचे तुषार यमगेकर यांनी अर्ज दाखल केले.
नगरसेवकपदासाठी क्रांती शिवणे, श्वेता कदम, बसवराज खणगावे, भैया नाईक, प्रकाश मोरे, दिलीप माने, अनिता पेडणेकर, वीणा कापसे, सरिता गुरव, बीणा कुराडे, नीलेश मालंडकर, शुभदा राहुल पाटील, द्राक्षायणी तारळे, शैलजा पाटील, कल्याणी खोराटे, सपना संकपाळ, सुलोचना मोरे, शशिकला पाटील, शारदा आजरी, बाळासाहेब घुगरे, उदय पाटील, कावेरी चौगुले, सागर कुराडे, सुनील चौगुले, रवींद्र पोतदार, संदीप नाथबुवा, हारुण सय्यद, नीलांबरी भुर्इंबर, सरिता भैसकर, रोहिणी गुरव, रूपाली परीट, सुनील गुरव, नरेंद्र भद्रापूर, सतीश हळदकर, शकुंतला हातरोटे, आदींनी अर्ज दाखल केले.
मिरवणुकीत माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्ष राजेश बोरगावे, प्रा. स्वाती कोरी, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, उमेदवार व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कागलमध्ये १०८ अर्ज
कागल : नगरसेवकपदासाठी ९४, तर नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे दाखल केले आहेत. नगराध्यक्षा संगीता प्रकाश गाडेकर यांनी शुक्रवारी प्रभाग ३ (ब) मधून अर्ज दाखल केला. गुरुवारी या प्रभागात श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी यांच्या पत्नी सुमन गवळी यांनी अर्ज भरला आहे. नगराध्यक्षपदासाठी आमदार मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे व मंडलिक या तीन गटांच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले आहेत.
महाआघाडीबद्दल उत्सुकता
भाजप-शिवसेना मित्रपक्ष महाआघाडी करून कागल व मुरगूड नगरपालिका लढविणार, या वृत्ताने निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. मात्र, अर्ज दाखल करताना तशा कोणत्या सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या नसल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुरगूडमध्ये तोबा गर्दी
मुरगूड : मुरगूड नगरपरिषदेसाठी शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच गटांच्या इच्छुकांनी तोबा गर्दी केली होती. नगरसेवकपदासाठी ८३, तर नगराध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज भरले. आतापर्यंत नगरसेवकपदासाठी १२५, तर नगराध्यक्षपदासाठी १२ जणांनी आवेदनपत्रे दाखल केली.
शुक्रवारी पाटील गटाच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी मंडलिक गटाकडून माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट व मारुती ओतारी यांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, अजितसिंह पाटील, रूपाली सणगर, सर्जेराव पाटील, गौराबाई सोनुले, दिगंबर परीट, दगडू शेणवी, शामराव घाटगे, अमर सणगर, उद्धव पाटील, शोभा परीट, राहुल खराडे, मोहन कांबळे, अशोक खंडागळे यांनी आवेदनपत्रे सादर केली.
जयसिंगपुरात
७० अर्ज दाखल
जयसिंगपूर : नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवकपदासाठी ६६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये ताराराणी आघाडीकडून १२, अपक्ष ४२, राजर्षी शाहू विकास आघाडी ९, शिवसेना २, इंडियन नॅशनल काँग्रेस २, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया २, भारिप बहुजन महासंघ १, असे एकूण ७० अर्ज दाखल झाले. शुक्रवारअखेर ११२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी डॉ. नीता अभिजित माने, स्नेहा संजय शिंदे, रंजना मारुती बल्लाळ, साजिदा सिराज घोरी यांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारअखेर नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
नगरसेवकपदासाठी प्रभाग १ : विमल चौगुले, संगीता पाटील. प्रभाग २ : सुशीला भेंडवडे, योगेश बलदवा, संजय जाधव, गजानन फाटक, अमित सांगले, गजाधन मानधना. प्रभाग ३ : रघुनाथ देशिंगे, शमसुद्दीन सय्यद, इम्रान शेख, संगीता खामकर. प्रभाग ४ : फुलाबाई बेडगे, मुक्ताबाई वगरे, स्वाती पडुळकर, चंद्रकांत चव्हाण, सुवर्णा पोवार, बजरंग खामकर, चंद्रकांत खामकर, राजश्री जाधव. प्रभाग ५ : अरुणा चव्हाण, स्वाती पडुळकर, निगार मणेर, शकुंतला मछले, रुपाली कलकुटगी, चंद्रकांत चव्हाण, चंद्रकांत खामकर, शैलेश चौगुले, दुर्गाप्पा वैदू. प्रभाग ६ : अर्चना शिंगाडे, राजेंद्र मगदूम, पराग पाटील. प्रभाग ७ : गणेश गायकवाड, अलका पाटील. प्रभाग ८ : अंजना भिसे, मुस्ताक अत्तार, आसलम फरास, प्रकाश ठाणेकर, सौरभ पवार, दिलीप भिसे. प्रभाग ९ : गंगाराम माने, संजय वैद्य, गुंडाप्पा पवार, सविता साळुंखे, अर्चना शिंदे, भारती माने, संगीता खामकर, जयश्री नरदे. प्रभाग १० : आसावरी आडके, स्वप्नाली नाळे, शोभा धोत्रे. प्रभाग ११ : महादेवी बिरादार, लक्ष्मण धोतरे, लक्ष्मण कलकुटगी, साजिद मुजावर, सचिन डोंगरे, धनाजी पवार, इकबाल मुजावर. प्रभाग १२ : सुलक्षणा कांबळे, मुसा डांगे, पंकज गुरव, धनंजय कर्णिक यांनी अर्ज दाखल केले. कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने कॉ. रघुनाथ देशिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कॉ. प्रा. मेघा पानसरे, कॉ. दिलीप पवार, सुशील यादव, अ‍ॅड. बळवंत पवार, भोला मुजावर उपस्थित होते.
पक्षांकडून उमेदवारी
शहरात पालिका निवडणुकीसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी विरुद्ध ताराराणी आघाडी पक्ष अशा दुरंगी लढतीचे चित्र असताना शिवसेनकडून दोन, काँग्रेसकडून दोन, तर ४२ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करून दोन्ही आघाड्यांसमोर तूर्त तरी आव्हान उभे केले आहे.
मलकापूरमध्ये २६ अर्ज
मलकापूर : नगराध्यक्षपदासाठी ३ व नगरसेवकपदासाठी २३ असे २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी एक व नगरसेवक पदासाठी आठ असे मिळून आजअखेर नगराध्यक्षपदासाठी चार व नगरसेवक पदासाठी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली.
नगराध्यक्षपदासाठी जनसुराज्य-भाजप युतीतून अमोल मधुकर केसरकर यांनी दोन, तर दिलीप आनंदा पाटील यांचे अर्ज दाखल झाले. प्रभागनिहाय अर्ज - प्रभाग १ (अ) मधून अश्विनी विशाल लोखंडे, १ (ब) मधून दिलीप आनंदा पाटील, २ (अ) शायरा शौकत कळेकर, २ (ब) मधून शौकत महंमद कळेकर, प्रवीण प्रभाकर प्रभावळकर, ३(अ) मधून अशोक विश्वनाथ देशमाने, ४ (अ)मधून भारत वासुदेव गांधी, ४ (ब)मधून पुष्पा चंद्रकांत पास्ते, माया सागर पाटील, ५ (अ) मधून शाहिदा जीवन मुजावर, ५ (ब) मधून प्रतापसिंह बाबासाहेब कोकरे-देसाई, बाबासाहेब तातोबा पाटील, ६ (अ)मधून धनंजय आबाजी गायकवाड, प्रल्हाद राजाराम पळसे, ६ (ब)मधून संगीता सुधाकर पाटील, ७(अ)मधून रमेश बाबू चांदणे, मानसिंग आनंदा कांबळे, ७ (ब) मधून प्रिया विजय कुंभार, सोनिया पंकज शेंडे, ८(अ) मधून लक्ष्मी चंद्रकांत घेवदे, ८(ब) मधून संगीता विष्णू कुंभार, रश्मी शंतनू कोठावळे, ८ (क) मधून रुपेश विलास वारंगे.
पन्हाळ््यात १९ अर्ज
पन्हाळा : नगराध्यक्षपदासाठी १ व नगरसेवकपदासाठी १४ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी साधना स्वप्नील काशिद यांचा अर्ज दाखल झाला. नगरसेवकपदासाठी तृप्ती बांदिवडेकर, वीणा बांदिवडेकर, तेजस्विनी गुरव, माधवी भोसले, सरिता वाडीकर, मधुरा कुराडे, इम्तियाज मोकाशी, यास्मीन मुजावर, मारुती गवळी, सुभाष गवळी, श्रीया नाखरे, दस्तगीर मुजावर, फिरोज मुजावर यांनी अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपदासाठी एकूण दोन, तर नगरसेवकपदासाठी एकवीस ते तेवीस अर्ज आले आहेत.
वडगावात फक्त तीन अर्ज
पेठवडगाव : वडगाव नगरपालिका निवडणुकीत शुक्रवारी पाचव्या दिवशी फक्त नगरसेवकपदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता होती; पण ती फोल ठरली.
शहरातील जवळपास सर्व गट, आघाड्यांनी संभावित इच्छुकांचे उमेदवारांचे आॅनलाईनवर अर्ज भरले आहेत. जवळपास ८८ जणांनी संगणकावर उमेदवारी नामांकने भरली आहेत. त्यामुळे ८४ उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सर्व आघाड्या, पक्ष यांनी संभाव्य उमेदवारीवरून नाराजी, संभावित फूट टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी युवक क्रांती आघाडीच्यावतीने दोन व एक अपक्ष अर्ज दाखल झाले. मनसेचे शहराध्यक्ष संतोष बबन चव्हाण यांनी प्रभाग सहा ‘ब’मध्ये सर्वसाधारण गटात, तसेच नम्रता संतोष ताईगडे यांनी प्रभाग क्रमांक सहा ‘अ’मध्ये सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केले. त्यांनी युवक क्रांतीकडून अर्ज दाखल केले आहेत. यादव गटाचे नगरसेवक संजय जाधव विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी अजय थोरात, शिवाजी आवळे उपस्थित होते, तर जमीर बाबासो म्हालदार (अपक्ष) यांनी प्रभाग क्रमांक पाच ‘ब’ सर्वसाधारण गटातून म्हणून अर्ज दाखल केला. (वार्ताहर/प्रतिनिधी)


इचलकरंजी नगरपालिकेसाठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल
इचलकरंजी : नगरसेवकपदासाठी शुक्रवारी ४८, तर नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज, शनिवारी निवडणूक आयोगाकडून अर्ज स्वीकारण्याची वेळ एक तासाने वाढविली आहे.
गुरुवारी (दि. २७) नगरसेवकपदासाठी तेरा अर्ज दाखल झाले होते; मात्र शुक्रवारी ४८ उमेदवारांनी ६१ अर्ज दाखल केले, तर नगराध्यक्षपदासाठी तिघांनी अपक्ष उमेदवारी भरली. शुक्रवारी राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार अशोक जांभळे यांच्यासह मंगल मुसळे, शोभा कांबळे व नितीन जांभळे या नगरसेवकांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेच्यावतीने नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी अर्ज दाखल केला, तर मॅँचेस्टर आघाडीचे प्रकाश मोरबाळे यांनी ताराराणी आघाडीकडून आणि माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी शाहू आघाडीकडून अर्ज भरले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, शनिवारी आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
भाजप ३२, ताराराणी ३०
शहर विकास आघाडी, शिवसेना व मॅँचेस्टर आघाडी यांची एकच ताराराणी आघाडी तयार केली आहे. भाजप व ताराराणी आघाडीची युती झाली असून, नगरसेवकपदासाठी भाजपकडून ३२, तर ‘ताराराणी’कडून ३० उमेदवार उभे राहतील. शिवाय नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अलका स्वामींचे नाव निश्चित केल्याची माहिती ‘शविआ’चे अध्यक्ष अजित जाधव यांनी दिली.

कुरुंदवाडमध्ये ४१ अर्ज दाखल
कुरुंदवाड : विविध प्रभागांतून नगरसेवकपदासाठी एकूण ४१, तर नगराध्यक्षपदासाठी सात अर्ज दाखल झाले.
धनत्रयोदशीचा मुहूर्त इच्छुक उमेदवारांनी साधल्याने निवडणूक कार्यालयात उमेदवार, सूचक, अनुमोदकासह समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी निवडणूक निरीक्षक दीपक नलावडे यांनी निवडणूक कार्यालयाला दिली.
शुक्रवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आजी, माजी नगरसेवक, तरुणांचा भरणा अधिक होता. नगराध्यक्षपदासाठी दादासो आप्पासो पाटील, जयराम कृष्णराव पाटील, विजय जयराम पाटील, रामचंद्र भाऊसो डांगे, हुमायुन मिरासो महात व मनीषा उदय डांगे यांचे दोन अर्ज मिळून एकूण सात अर्ज दाखल झाले. शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना अशी चौरंगी लढत होत असल्याने शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Most of the candidates opted for Dhanteras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.