बहुतांश शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:18 AM2017-07-23T00:18:58+5:302017-07-23T00:18:58+5:30
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात प्रशस्त प्रशासकीय इमारतीचा अभाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क--सातारा : खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून गायब असलेले खासदार उदयनराजे भोसले शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक साताऱ्यात आले. सुमारे पाच तास त्यांनी शहरात थांबून सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर ते पुण्याला निघून गेले.
सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गेल्या तीन महिन्यांपासून उदयनराजे साताऱ्यातही फिरकले नाहीत. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांनी अचानक साताऱ्यात येऊन कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला. महामार्गावरून उदयनराजे शहरात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली. जलमंदिरवर गेल्यानंतर मातोश्री कल्पनाराजे भोसले यांची त्यांनी केवळ दहा मिनिटे भेट घेतली. त्यानंतर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान सातारा विकास आघाडीचे नगरसेवक यदू नारकर, अल्लाउद्दीन शेख, प्रशांत आहेरराव यांच्यासह अनेकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. बऱ्याच दिवसांतून उदयनराजे साताऱ्यात येत असल्यामुळे अनेकांना गहिवरून आले. अनेकजण त्यांच्या पाया पडत होते. लहान मुलेही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत होती. शहरातील बोळाबोळातून ते कार्यकर्त्यांसह सरसावत होते. ‘उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है,’अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. राजपथावरून कमानी हौद, गुरुवार बाग परत बसस्थानक तेथून राधिका रस्ता असा त्यांनी फेरफटका मारला. रात्री एकच्या सुमारास उदयनराजे पुण्याकडे निघून गेले. ही
पोलिसांची ऐनवेळी पळापळ !
खासदार उदयनराजे रात्री साडेनऊच्या सुमारास साताऱ्यात आले. नेमकी हीच वेळ पोलिसांची ड्यूटी करण्याची होती. त्यामुळे पोलिस कुमकही विखुरली गेली होती. उदयनराजे स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, पोलिसांच्या काहीच हालचाली दिसत नव्हत्या. ना पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्त ना शहरात. उदयनराजे मात्र कार्यकर्त्यांच्या गऱ्हाड्यात इकडून-तिकडे फिरत होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा पाहण्यासाठी रात्री अनेकजण घराबाहेर आले होते. काहींनी उदयनराजेंना भेटून आपल्या समस्या थोडक्यात सांगितल्या.
नासीर शेख यांच्या घरीही भेट...
उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी नगराध्यक्ष नासीर शेख यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या आघाडीमध्ये पालिका निवडणूक काळामध्ये प्रवेश केला होता. मात्र, तरीही उदयनराजेंनी झाले गेले विसरून शेख यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांच्या तसेच सातारकरांच्या भुवया उंचावल्या.