बहुतांशी पंचायतीत काँग्रेस सत्तेजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:34+5:302021-01-01T04:17:34+5:30

राजकीय हालचाली लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी : विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करलेल्या काँग्रेसने निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दमदार कामगिरी केली ...

Most of the panchayats are close to Congress | बहुतांशी पंचायतीत काँग्रेस सत्तेजवळ

बहुतांशी पंचायतीत काँग्रेस सत्तेजवळ

Next

राजकीय हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी : विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करलेल्या काँग्रेसने निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये दमदार कामगिरी केली आहे. निपाणी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचली आहे. काही ठिकाणी त्रिशंकू अवस्था असून काही ठिकाणी भाजपने सत्तास्थापनेच्या जवळ जाण्यास यश मिळवले आहे. आता अध्यक्ष पदाच्या आरक्षणांतर दोन्ही पक्षांच्या राजकीय हालचालींवर, सत्ता नेमकी कोणता पक्ष स्थापन करतो, हे स्पष्ट होणार आहे.

दुसऱ्या टप्यात पार पडलेल्या ग्रा.पं. निवडणुकीचे निकाल ३० रोजी समोर आले. रात्री अडीच वाजता शेवटचा निकाल समोर आला. शेवटच्या टप्प्यात किरकोळ वाद वगळता मतमोजणी सुरळीत पार पडली. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. मध्यरात्रीही कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत होते.

निपाणी तालुक्यावर जोल्ले दांपत्याचे पर्यायाने भाजपचे वर्चस्व आहे. गेल्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा, लोकसभा व अन्य काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे निपाणी तालुक्यावर जोल्ले दाम्पत्याची पकड असल्याचे स्पष्ट झाले होते. पंचायतीमध्ये मात्र काँग्रेसने कांटे की टक्कर देत बहुतांशी पंचायतींत सत्तेच्या जाण्यात यश मिळवले आहे.

फोटो

निपाणी : ग्रा.पं निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी असा जल्लोष केला.

Web Title: Most of the panchayats are close to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.