कोरोनाला हरवून सर्वाधिक रुग्ण घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:26 AM2021-07-29T04:26:11+5:302021-07-29T04:26:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी येत असून बुधवारी सायंकाळी ४४७ नवे रुग्ण नोंदवण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी येत असून बुधवारी सायंकाळी ४४७ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात २३६१ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या ७ हजार ८३४ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे दिलासादायक आहे.
कोल्हापूर शहरात १४६, करवीर तालुक्यात ९१ आणि हातकणंगले तालुक्यात ४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर करवीर तालुक्यात चार, पन्हाळा तालुक्यातील तीन तर इतर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस सातत्याने रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी येत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
चौकट
तालुकावार मृत्यू
करवीर ०४
माळवाडी गिरगाव, पाडळी, पाचगाव, कणेरीवाडी
पन्हाळा ०३
वाडी रत्नागिरी, पोर्ले, पोखले
कोल्हापूर ०१
यादवनगर
हातकणंगले ०१
भादोले
इचलकरंजी ०१
दाते मळा
भुदरगड ०१
दोनवडे
इतर जिल्हे
आष्टा, जनवाड, सौंदलगा