अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत केआयटीला सर्वाधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:31 PM2021-01-15T12:31:20+5:302021-01-15T12:33:08+5:30

college Kolhapur- अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया २०२०-२१ च्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय रिपोर्टिंग सुरू झाले.

Most preferred to KIT in the first round of engineering admission process | अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत केआयटीला सर्वाधिक पसंती

कोल्हापुरात केआयटी महाविद्यालयामध्ये पहिला प्रवेश घेणाऱ्या सुकन्या पंदारे या विद्यार्थिनीसह तिच्या पालकांचे स्वागत केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी केले. यावेळी शेजारी मनोज मुजुमदार, दत्तात्रय साठे, समीर नागतीलक, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत केआयटीला सर्वाधिक पसंती विद्यार्थ्यांचे प्राधान्य : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून यादी जाहीर

कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया २०२०-२१ च्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय रिपोर्टिंग सुरू झाले.

राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ह्यकेआयटीह्णला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे निदर्शनास आले.

नव्याने सुरू झालेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, केवळ केआयटीमध्ये असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या शाखांनाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मॅकेनिकल विभागाला विद्यार्थ्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे.

दरम्यान, प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रियेमध्ये गुरुवारी पहिला प्रवेश घेणाऱ्या सुकन्या पंदारे (येळाणे, ता. मलकापूर) या विद्यार्थिनीचे पुस्तक आणि कन्फर्मेशन लेटर देऊन केआयटीचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी स्वागत केले. रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. डी. जे. साठे, प्रवेशप्रक्रिया समन्वयक समीर नागतीलक आदी उपस्थित होते.


गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रवेशाचा आकडा वाढून समाधानकारक आहे. सर्वाधिक पसंतीमुळे केआयटीवरील पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे कौशल्य, महाविद्यालयाची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
- भरत पाटील,
अध्यक्ष, केआयटी.

 

Web Title: Most preferred to KIT in the first round of engineering admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.