बहुतांश शिवमंदिरे बंद, मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:43 AM2021-03-13T04:43:44+5:302021-03-13T04:43:44+5:30

इचलकरंजी : शहर परिसरात महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार शहर व ...

Most of the Shiva temples are closed, police are deployed outside the temples | बहुतांश शिवमंदिरे बंद, मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त

बहुतांश शिवमंदिरे बंद, मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त

Next

इचलकरंजी : शहर परिसरात महाशिवरात्री भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नगरपालिका प्रशासनाच्या आदेशानुसार शहर व परिसरात बहुतांश शिवमंदिरे बंद ठेवण्यात आली. प्रमुख शिवमंदिरांच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे भाविक मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेत होते.

कोरोनाच्या महामारीमुळे सध्या प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक कार्यक्रम व समारंभांवर बंदी घालण्यात आली आहे. गावभागातील महादेव मंदिरमध्ये शंकराच्या पिंडीवर गुरव परिवाराकडून रात्री साडेबारा वाजता मुहूर्ताचा अभिषेक करण्यात आला. सकाळी सव्वानऊ वाजता व संध्याकाळी सात वाजता आरती करण्यात आली. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. शहरातील मॉडर्न हायस्कूलजवळील शिवमंदिर, रिंग रोडवरील निळकंठेश्वर मंदिर, मंगलधाम येथील महादेव मंदिर, पंचगंगा नदीकाठावरील महादेव मंदिर, आदी ठिकाणी विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.

फोटो ओळी

११०३२०२१-आयसीएच-०७

इचलकरंजीतील गावभाग महादेव मंदिरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Most of the Shiva temples are closed, police are deployed outside the temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.