जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:32 PM2019-11-09T14:32:50+5:302019-11-09T14:35:27+5:30

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर्मचारी सर्वाधिक आहेत.

Most Zilla Parishad staff passed | जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण

जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्णसेवा प्रवेशोत्तर परीक्षा, पाच जिल्ह्यांत उत्तम कामगिरी

कोल्हापूर : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये कोल्हापूरजिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांपेक्षा हे कर्मचारी सर्वाधिक आहेत.

जिल्हा परिषदेच्या सेवेत जे वर्ग ३ चे कर्मचारी येतात, त्यांच्या सेवेची तीन वर्षे झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीक्षा घेण्यात येते. तीन वर्षांमध्ये त्यांनी जे काही प्रत्यक्षात काम करताना ज्ञान संपादन केलेले असते, त्यावर आधारित अशी ही परीक्षा घेण्यात येते. शासकीय नियम आणि करावयाची कार्यवाही याबाबत दीर्घोत्तरी उत्तरे देण्याची ही परीक्षा असते.

या परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नुकताच जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्वाधिक कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी जिल्हा परिषदेचे कर्मचारी कामामध्ये अद्ययावत असावेत, अशी नेहमीच भूमिका घेतली आहे. तसा आग्रह ते नेहमीच धरत असतात. यालाच प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या सेवेत गेल्या तीन वर्र्षांत आलेल्या कर्मचाऱ्यांनीही चांगली कामगिरी करून दाखविली आहे.

जिल्हा परिषद        परीक्षेस बसलेले कर्मचारी       उत्तीर्ण कर्मचारी
कोल्हापूर                              ११८                              ८०
सांगली                                   ७६                               ४५
सातारा                                   ७२                               ४४
पुणे                                        ८८                               ३४
सोलापूर                                १०२                              ४८
 

 

Web Title: Most Zilla Parishad staff passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.