दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या मुलाचा आईने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:28 AM2020-06-02T10:28:31+5:302020-06-02T10:30:44+5:30
कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला.
इचलकरंजी : कोरोची (ता हातकणंगले) येथील तीन विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलग्याचा डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईने खून केला. रवि शंकर तेलसिंगे (वर 38) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीसांनी आई लक्ष्मी हिला ताब्यात घेतले आहे.
रवी हा दारूचा व्यसनी होता तो दररोज दारू पिऊन आईला मारहाण करीत होता. अलीकडे दोन महिन्यात त्याचा त्रास खूपच वाढला होता. अखेर दररोजच्या त्रासाला कंटाळून काल सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आईने घरातील दगडी खलबत्ता मुलाच्या डोक्यात मारला.
त्यामध्ये रवी गंभीर जखमी झाला होता. त्याला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला.