मुलास विषारी औषध देऊन आईचा आत्महत्येचा प्रयत्न, आईची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 02:26 PM2022-07-28T14:26:51+5:302022-07-28T19:05:11+5:30
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही
सुहास जाधव
पेठवडगाव : पेठवडगाव (ता.हातकणंगले) येथे मुलास विषारी औषध देऊन आईनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज गुरूवारी दुपारी उघडकीस आली. लक्ष्मी मनोज भस्मे तर वेदांत भस्मे अशी या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या माय-लेकराची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
वेदांत यास उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्याच्या बाबतीत नेमकी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. लक्ष्मी यांना वडगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.