वडणगेतील मातेची दोन चिमुरड्यांसह पंचगंगा नदीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:05 PM2020-11-09T12:05:16+5:302020-11-09T12:08:23+5:30

suicide, crimenews, police, kolhapurnews वडणगे (ता.करवीर) येथील मातेने आपल्या दोन चिमुरड्या मुलींसह कोल्हापुरात पंचगंगा नदीत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३२) असे त्या मातेचे तर श्रीशा ऊर्फ आर्या (१२) व साम्राज्ञी ऊर्फ खुशी (७ वर्षे. सर्व रा. बेघर वसाहत, इंदिरानगर, वडणगे) असे दुदैवी दोन्ही चिमुरड्या मुलींची नावे आहेत. पंचगंगा घाटाजवळ नदीपात्रात रविवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास या तिघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. या घटनेमुळे घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळपासून त्या तिघी बेपत्ता होत्या.

Mother commits suicide in Panchganga river with two chimpanzees | वडणगेतील मातेची दोन चिमुरड्यांसह पंचगंगा नदीत आत्महत्या

वडणगेतील मातेची दोन चिमुरड्यांसह पंचगंगा नदीत आत्महत्या

Next
ठळक मुद्देवडणगेतील मातेची दोन चिमुरड्यांसह पंचगंगा नदीत आत्महत्या पाण्यावर तरंगताना मिळाले मृतदेह; आयुष्याला कंटाळून जीवनयात्रा संपविली

कोल्हापूर : वडणगे (ता.करवीर) येथील मातेने आपल्या दोन चिमुरड्या मुलींसह कोल्हापुरात पंचगंगा नदीत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३२) असे त्या मातेचे तर श्रीशा ऊर्फ आर्या (१२) व साम्राज्ञी ऊर्फ खुशी (७ वर्षे. सर्व रा. बेघर वसाहत, इंदिरानगर, वडणगे) असे दुदैवी दोन्ही चिमुरड्या मुलींची नावे आहेत. पंचगंगा घाटाजवळ नदीपात्रात रविवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास या तिघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. या घटनेमुळे घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळपासून त्या तिघी बेपत्ता होत्या.

याबाबत माहिती अशी की, सुनेत्रा सावळकर यांचे माहेर तेर (जि. उस्मानाबाद, मूळ सासर केसगाव उस्मानाबाद) असून चाळीस वर्षे वडणगे (ता. करवीर) येथे दोन मुली व सासू रत्नामाला, सासरे कोंडिबा गेनबा सावळकर यांच्यासह राहत होत्या. दोन दीर पुणे व नाशिक येथे राहतात. सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या पतीचे पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले.

कौटुंबीक गाडा चालविण्यासाठी त्या वर्षीपासून कोल्हापुरात ज्वेलर्सच्या दुकानात सेल्ममनची नोकरी करत होत्या. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जेवणाचा डबा सोबत घेतला, दोन्ही मुलींचे बँक पासबुकासाठी फोटो काढायचे सांगून घरातून बाहेर पडल्या. रात्री कामावरून घरी न आल्याने त्यांच्या सासऱ्यांनी, नातेवाईकांनी शोधाशोध केली. रविवारी सकाळी त्यांच्या सांगलीतील बहिणीच्या पतीने करवीर पोलीस ठाण्यात बेपत्ताची फिर्याद दिली.

दरम्यान, दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास या तिघींचे मृतदेह पंचगंगा नदीघाटावर पाण्यात तरंगताना नागरिकांनी पाहिले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवावांनी व पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविले.

साम्राज्ञीला ओढणीने कमरेला बांधून आत्महत्या सुनेत्रा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रथम श्रीशा यांना नदीच्या पाण्यात बुडविल्याची शक्यता आहे, कारण श्रीशाचा मृतदेह कडेलाच मिळाला तर लहान मुलगी साम्राज्ञी हिला आपल्या कमरेला ओढणीने घट्ट बांधून पाण्यात उडी मारली असल्याची शक्यता आहे. कारण सुनेत्रा यांच्या पाठीला साम्राज्ञी ओढणीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत दोघींचे मृतदेह एकत्र पाण्यात तरंगत होते. हे हृदद्रावक दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.

आयुष्याला कंटाळले....मेहुण्याला पाठवला, व्हॉटस्‌ ॲप मेसेज

शनिवारी घरातून बाहेर पडल्यानंतर कामावर न जाता सुनेत्रा ह्या दोन्ही मुलींना दिवसभर घेऊन पंचगंगा नदीघाटावर बसल्या असाव्यात. तेथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असल्याने अंधार पडल्यानंतर त्यांनी रात्री दोन्ही मुलींसह आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. घाटावर एका पिशवीत जेवणाच्या डबा, दुसऱ्या पिशवीत तिघांची आधारकार्ड व कागदपत्रे, तसेच पर्समध्ये काही कागदपत्रे व प्लास्टिक पिशवीत चपला मिळाल्या.

दरम्यान, शनिवारीच दुपारी चार वाजता त्यांनी आपल्या बहिणीचे पती (मेहुणे) महेश्वर धोपी (रा. माधवनगर, सांगली) यांना व्हॉटस्‌ ॲपवर सुसाईड नोटचा फोटो पाठविला. त्यावर सुनेत्राने ह्यमाझ्या घरातील सर्वजण मला माफ करा... माझ्या आत्महत्येचा दोष कोणावरही देऊ नये, यात कोणाचाही काही संबंध नाही, माझ्या आयुष्याला मी कंटाळले आहे असे त्यामध्ये नमूद होते.

 

Web Title: Mother commits suicide in Panchganga river with two chimpanzees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.