विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 04:02 PM2020-11-10T16:02:49+5:302020-11-10T16:20:58+5:30

mahavitran, death, kolhapurnews गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू झाला. विजेची तार ओढयातील पाण्यात पडल्याने धुणे धुण्यासाठी त्या दोघी गेल्या असता आज सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५५) व अनुराधा महेश येडेकर (वय २७) अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या सासु -सुनेची नावे आहेत.

Mother-in-law died on the spot due to electric shock | विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू

विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू

Next
ठळक मुद्देविजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यूमहावितरण कंपनीने मागणीकडे कानाडोळा केल्याने दुर्घटना

गडमुडशिंगी - गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे विजेचा शॉक लागून सासू-सुनेचा जागेवरच मृत्यू झाला. विजेची तार ओढयातील पाण्यात पडल्याने धुणे धुण्यासाठी त्या दोघी गेल्या असता आज सकाळी साडेदहा वाजता ही दुर्घटना घडली. मीना विष्णू येडेकर (वय ५५) व अनुराधा महेश येडेकर (वय २७) अशी या दुर्घटनेत बळी पडलेल्या सासु -सुनेची नावे आहेत.

मुडशिंगी ग्रामस्थ तसेच करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने यापूर्वी ओढयावरून गेलेल्या या धोकादायक विजेच्या तारा बदलण्यांबाबत महावितरण कंपनीला अनेकवेळा निवेदने दिली होती, पण या मागणीकडे महावितरण कंपनीने कानाडोळा केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.

दरम्यान, दुर्घटनेनंतर संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी महावितरण कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून दोन्ही मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास विरोध केला. यावेळी गांधीनगर पोलीस ठाणे अधिकारी घटनास्थळी पोचून त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सीपीआर कडे रवाना केले.

सीपीआर मध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांचा तसेच ग्रामस्थांचा पुन्हा उद्रेक होऊन महावितरण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली. यावेळी सीपीआर परिसरात गोंधळ माजला. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

Web Title: Mother-in-law died on the spot due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.