आईमुळेच शिकायची सुरुवात होते

By Admin | Published: July 25, 2016 10:14 PM2016-07-25T22:14:41+5:302016-07-25T23:11:27+5:30

भाई खोत : रोटरी क्लब, मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

Mother starts learning about it | आईमुळेच शिकायची सुरुवात होते

आईमुळेच शिकायची सुरुवात होते

googlenewsNext

कणकवली : सानेगुरुजी वाचताना डोळ्यांत अश्रू येतात. आईविना आपण भिकारी आहोत. आई, मातृभूमी श्रेष्ठच आहे. आज रोटरी व मायादेवी ट्रस्टतर्फे आईचे स्मरण करून अतिशय चांगला कार्यक्रम येथे घेतला आहे. अतिशय तहानलेल्या व्यक्तीला पाणी मिळालं की तृप्ती मिळते, तसे समाधान या कार्यक्रमामुळे सर्वांना मिळाले आहे. आई हीच आपली गुरू असते. तिच्यामुळेच घराच्या उंबरठ्यापासून आपली शिकायची सुरुवात होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई खोत यांनी येथे केले.
रोटरी क्लब कणकवली आणि मायादेवी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे वाटप कार्यक्रम शनिवारी येथील मराठा मंडळ सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी
डॉ. अनंत नागवेकर होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, उपाध्यक्ष व्ही. के. रावराणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेश कामत, मराठा मंडळाचे डॉ. चं. फ. राणे, रोटरीचे अध्यक्ष अनिल कर्पे, शशिकांत सावंत, डॉ. प्रवीण बिरमोळे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. जी. ए. सावंत म्हणाले, आई हा शब्द आपल्या मुखात आहे तोपर्यंत आपण माणूस म्हणून घेण्यास लायक आहोत. परमेश्वराला आपण माउली म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असले तरी त्यांना जिजाऊंनीच घडविले. परस्त्रीकडे माउली म्हणून बघण्याचे संस्कार जिजाऊंनी दिले. मात्र, आजकाल वादाचे मुद्दे येत असल्याने मोठ्या माणसांना छोटे करण्याचे प्रकार पाहून वाईट वाटते.
प्रास्ताविकात अ‍ॅड. राजेंद्र रावराणे म्हणाले, आज अनेकजण सांगतात की, तुमच्या आईचे आम्ही विद्यार्थी, तेव्हा ऊर भरून येतो. २००७ ला आईच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. दरवर्षी समाजात योगदान दिलेल्या ज्येष्ठांचा शोध घेऊन आम्ही त्यांचा सत्कार करतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतो. आई-वडील हे प्रथम देवता मानूनच ट्रस्टतर्फे उपक्रम सुरू आहेत.
या कार्यक्रमात महादेव पेडणेकर, वसंत कदम, आत्माराम म्हाडेश्वर, नारायण परब, आर. व्ही. नाईक, रमेश चिंदरकर, अलका सावंत, भाई खोत, प्रा. जी. ए. सावंत, श्रीधर बडे, पंडित दत्तात्रय रावराणे, धनाजी आर्डेकर, अनिता शेट्ये, हेमलता परब, कल्पना ढेकणे, सरोज पडते या ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या सदस्यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दादा कुडतरकर यांनी विचार मांडले.
प्रा. जगदीश राणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद रावराणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. दीपक अंधारी, राजश्री रावराणे, शेखर राणे, बंडू हर्णे, अ‍ॅड. विलास परब, भास्कर गावडे, पृथ्वी रावराणे, आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)


अनाथांना मदतीचा हात द्या
संदेश पारकर म्हणाले, समाजाचं आपण देणं लागतो ही भावना महत्त्वाची आहे. अ‍ॅड. रावराणेंसारखी सामाजिक बांधीलकी सर्वांनी जपली तर समाजात नक्कीच बदल होईल. कणकवली शहर घडविण्यामागे ज्येष्ठांचे योगदान समाज कधीही विसरणार नाही.
व्ही. के. तथा विश्राम रावराणे यांनी आईचे उपकार कधीही फिटू शकत नाहीत, अशा माऊलीचा सत्कार होतो, तसा अनाथाश्रमामधील माता, भगिनींचाही सत्कार होऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असे सांगितले.

Web Title: Mother starts learning about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.