Kolhapur: मुलीला शाळेला सोडायला निघालेल्या आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, बसखाली सापडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By उद्धव गोडसे | Published: July 19, 2023 02:14 PM2023-07-19T14:14:30+5:302023-07-19T14:33:09+5:30

स्पीड ब्रेकरवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

Mother who was going to drop her daughter to school lost control of the bike, the girl was found under the bus and died in kolhapur | Kolhapur: मुलीला शाळेला सोडायला निघालेल्या आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, बसखाली सापडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Kolhapur: मुलीला शाळेला सोडायला निघालेल्या आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले, बसखाली सापडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

कोल्हापूर : अंगणवाडीत शिकणा-या मुलीला दुचाकीवरून शाळेत सोडताना स्पीड ब्रेकरवर आईचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. धडपडीत दुचाकीवरून पडलेल्या मुलीच्या डोक्यावरून पाठीमागून आलेल्या केएमटी बसचे चाक गेल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला.

संस्कृती रत्नदीप खरात (वय ४, रा. फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (दि. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास सानेगुरूजी वसाहत येथील केएमटीच्या बसस्टॉपजवळ घडला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, फोर्ड कॉर्नर येथील रत्नदीप खरात यांची सासरवाडी जिवबानाना पार्क येथे आहे. त्यांची पत्नी स्नेहा बुधवारी सकाळी जिवबानाना पार्क येथील घरातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. यावेळी बस स्टॉपवर थांबलेल्या केएमटीच्या बसला ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकरवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. या धडपडीत मुलगी दुचाकीवरून डाव्या बाजूला खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बसचे उजव्या बाजूचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेले, तर स्नेहा या दुचाकीसह उजव्या बाजूला कोसळल्या. डोक्यावरून चाक गेल्यामुळे संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डोळ्यासमोरच मुलीचा दुर्दैवी अपघात झाल्याने संस्कृतीच्या नातेवाईकांना धक्का बसला.

Web Title: Mother who was going to drop her daughter to school lost control of the bike, the girl was found under the bus and died in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.