मोटारसायकल रॅलीने कोल्हापुरात शिवजयंती उत्सवास प्रारंभ; शिवाजी महाराजांचा जयघोष
By संदीप आडनाईक | Updated: April 16, 2023 21:26 IST2023-04-16T21:26:19+5:302023-04-16T21:26:47+5:30
हातात भगवे ध्वज, पताका, संयुक्त मंगळवार पेठ आणि राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवास रविवारी प्रारंभ झाला

मोटारसायकल रॅलीने कोल्हापुरात शिवजयंती उत्सवास प्रारंभ; शिवाजी महाराजांचा जयघोष
कोल्हापूर : तरुणाईचा सळसळता उत्साह 'जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा अखंड जयघोषात रविवारी निघालेल्या मोटारसायकल रॅलीने संयुक्त मंगळवार पेठेच्या शिवजयंती उत्सवास प्रारंभ झाला. हातात भगवे ध्वज फिरवत, कपाळावर बांधलेल्या भगव्या पट्ट्या आणि फलक घेतलेले शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
संयुक्त मंगळवार पेठ आणि राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवास रविवारी प्रारंभ झाला. मिरजकर तिकटी, शाहू बँक, नंगिवली चौक, लाड चौक, न्यू महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, भवानी मंडप, बिंदूचौक, आझाद चौक, सुभाष रोड, खासबाग मैदान, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर या मुख्य मार्गासह मंगळवार पेठ परिसरातील उपनगरातून शिवछत्रपतींचा जयघोष करीत निघालेल्या या मोटारसायकल रॅलीचा समारोप मिरजकर तिकटी येथे झाला. या रॅलीत शेकडो युवक मोटारसायकलीसह सहभागी झाले होते.
या रॅलीचे उद्घाटन यशराजे छत्रपती आणि उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या रॅलीत वस्ताद बाबूराव चव्हाण, विजय देवणे, आदिल फरास, अनिकेत घोटणे, उत्सव समिती अध्यक्ष कुणाल डाकवे, श्रीधर पाटील, प्रसाद देवणे, साई चौगुले, निखिल पाटील, सिद्धेश पाटील, रमेश मोरे, संदीप चौगुले, प्रथमेश मोहिते, आर्यनील जाधव, पप्पू सुर्वे, जयसिंग शिंदे, स्वप्नील पार्टे, चंद्रकांत भोसले, नंदू यादव, प्रसाद जाधव, मदन चोडणकर, अशोक पोवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.