महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:58 AM2020-02-10T11:58:23+5:302020-02-10T12:00:30+5:30

शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा १६ फेबु्रवारी रोजी महास्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी कोअर कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

Motorcycle Rally of Maharashtra High School Alumni | महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची मोटारसायकल रॅली

कोल्हापुरात महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या महास्नेहमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची मोटारसायकल रॅलीमहास्नेहमेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा १६ फेबु्रवारी रोजी महास्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी कोअर कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजमधील १९६० ते २०१९ या कालावधीमधील माजी विद्यार्थ्यांचा महास्नेहमेळावा होणार आहे. माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन आहे. मेळाव्याला जास्तीत-जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, या उद्देशाने रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र हायस्कूल येथून रॅलीला सुरुवात झाली. यानंतर निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, जुना वाशी नाका, लाड चौक, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर चौकमार्गे दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.

यावेळी संस्थेचे संचालक आर. डी. पाटील, मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, उपप्राचार्य यू. आर. आतकिरे, पर्यवेक्षक यू. एम. पाटील, के. ए. ढगे, कोअर कमिटीचे नगरसेवक शेखर कुसाळे, विश्वजित शिंदे, प्रताप जाधव, रोहित भोईटे, संदीप पाटील, सौरभ सरनाईक, उदय देसाई, अजित दळवी, अभिजित नरके, सत्यजित पोवार, अनुयश पाटोळे, सौरभ पाटील, नीरज थोरात, आदी उपस्थित होते.

गुलाबी फेटे आकर्षण

मोटारसायकल रॅलीमध्ये माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गुलाबी फेटे घालून सहभाग नोंदविला. एकत्र सेल्फी घेण्यात आली. ४० वर्षांपूर्वीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

 

 

Web Title: Motorcycle Rally of Maharashtra High School Alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.