कोडोली येथील नरसोबा ओढ्यावर झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 23:28 IST2025-01-14T23:28:15+5:302025-01-14T23:28:51+5:30

मोटारसायकल स्वार ठार

Motorcyclist killed in accident on Narasoba stream in Kodoli | कोडोली येथील नरसोबा ओढ्यावर झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार ठार

कोडोली येथील नरसोबा ओढ्यावर झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार ठार

कोडोली : वठार बोरपाडळे राज्य मार्गावर कोडोली येथील नरसोबा मंदिर जवळ असलेल्या ओढयावरील पुलावर उसाचा ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्या झालेल्या धडकेत मोटारसायकल स्वार जागेवरच ठार झाला. या अपघातात मोटारसायकल चालक दिनकर मारूती राणे (वय ५८ रहाणार तळसंदे ता. हातकणंगले ) हे ठार झाले तर आनंदराव बापू पाटील (वय ५५ रहाणार तळसंदे ) हे जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. या घटनेची नोद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

  अपघातानंतर टॅक्टर चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत . याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, दिनकर राणे यांचा मुलगा थेरगाव ता शाहूवाडी येथे रहाणेस आहे. मुलास भेटणेसाठी ते व आनंदराव पाटील मंगळवारी सकाळी गेले होते. मुलास भेटून ते मोटारसायकल क्रंमाक एमएच ०९ जीएन ८३१४ वरून तळसंदे कडे येत होते. यावेळी बांबवडे कडे जाणारा उसाचा ट्रॅक्टर व मोटारसायकलची धडक झाली. यावेळी मोटारसायकल चालक राणे हे डाबरी रस्यावरच डोक्यावर पडलेने त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले पाटील हे हातावर पडल्याने त्यांच्या हातास जबर मार लागला आहे.

 राणे यांना उपचारासाठी येथील यशवंत हॉस्पिटल मध्ये आणणेत आले होते परंतु उपचारा पुर्वीच ते मयत असल्याने डॉक्टरांनी जाहिर केले. पाटील यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करणेत आले असून त्यांच्या उपचार चालू आहेत. राणे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सुना नातंवडे असा परीवार आहे. चौकट ओढ्यावरीत अपघातात पहिला बळी ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूस धोकादायक वळणे आहेत त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले असून मोठ्या प्रमाणावर वित्त हाणी झाली तसेच काहीजण जखमी झाले परंतु कोणाचाही प्राण गेला नव्हता . या अपघातात मात्र पहिलाच बळी गेल्याची घटना घडली.

Web Title: Motorcyclist killed in accident on Narasoba stream in Kodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.