गाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:25 PM2020-09-02T16:25:50+5:302020-09-02T16:26:48+5:30

आडवी गाडी का घातलीस, या कारणावरून तिघांनी एका मोटारकार चालकास लोखंडी जॅक व दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री देवकर पाणंदीच्या परिसरात घडली. या घटनेत स्वप्निल संभाजी शिंदे (वय ३१, रा. मातोश्री फार्म हाऊस, गिरगाव, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.

The motorist was hit as the vehicle was parked horizontally | गाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण

गाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण

Next
ठळक मुद्देगाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण देवकर पाणंदमधील घटना : चालक गंभीर; तिघांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : आडवी गाडी का घातलीस, या कारणावरून तिघांनी एका मोटारकार चालकास लोखंडी जॅक व दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री देवकर पाणंदीच्या परिसरात घडली. या घटनेत स्वप्निल संभाजी शिंदे (वय ३१, रा. मातोश्री फार्म हाऊस, गिरगाव, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल शिंदे हे देवकर पाणंद येथील जितू पाटील यांच्या मोटारीवर चालक म्हणून काम करतात. मंगळवारी रात्री ते मोटारकारमधून पाटील यांच्या देवकर पाणंदमधील घरी आले होते. त्याचवेळी पाठीमागून एका आलिशान मोटारीतून तिघे आले, त्यांनी मोटारीतून उतरून स्वप्निल शिंदे यांना गाडीतून बाहेर ओढून, तू आमच्या गाडीच्या आडवी मोटार का घातलीस? असा जाब विचारून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने आपल्या मोटारीतील लोखंडी जॅक काढून त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर दुसऱ्याला दगडाने मारहाण केली.

या घटनेत स्वप्निल हे गंभीर जखमी झाले. त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी अनिल मिस्त्री (रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद), मनोज मोहिते (रा. मनोरमानगर, देवकर पाणंद), विजय कदम (रा. कारंजकर हॉस्पिटलशेजारी, संभाजीनगर) या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
 

Web Title: The motorist was hit as the vehicle was parked horizontally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.