वीज बिल भरण्याच्या संभ्रमावस्थेमुळे थकबाकीचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:58+5:302021-02-05T07:14:58+5:30

कोल्हापूर : वीज बिलांचा इमानेइतबारे भरणा करण्यात राज्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात आता मात्र वीज बिल माफीच्या संभ्रमावस्थेमुळे तब्बल ३३६ ...

A mountain of arrears due to the confusion of paying electricity bills | वीज बिल भरण्याच्या संभ्रमावस्थेमुळे थकबाकीचा डोंगर

वीज बिल भरण्याच्या संभ्रमावस्थेमुळे थकबाकीचा डोंगर

Next

कोल्हापूर : वीज बिलांचा इमानेइतबारे भरणा करण्यात राज्यात आघाडीवर असलेल्या कोल्हापुरात आता मात्र वीज बिल माफीच्या संभ्रमावस्थेमुळे तब्बल ३३६ कोटी ४३ इतक्या विक्रमी थकबाकीचा डोंगर वाढला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यापर्यंत ३२ कोटींची थकबाकी होती. कोरोनाच्या १० महिन्यांच्या काळात ३०३ कोटींची भर पडली. डबघाईला आलेला गाडा हाकण्यासाठी आता महावितरणने आक्रमक होत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक नियमित वीज बिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलिंग सायकलमुळे एरव्ही दरमहा २० ते २१ कोटी रुपयांची थकबाकी असे; पण लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलांचा भरणा झाला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर सुलभ हप्ते पाडून दिले, पण तरीही लोकांनी प्रतिसाद दिला नाही. त्याच वेळी ‘वीज बिल भरणार नाही,’ असे आंदोलन सर्वपक्षीय कृती समितीने सुरू केले आहे. रस्त्यावरची आंदोलने करत मंत्रालयात ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह थेट शरद पवार यांच्यापर्यंत आंदोलकांनी वीज बिल माफीचा लढा नेला; पण त्याचा निर्णय झाला नसल्याने बिल भरायचे की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. यामुळे नियमितपणे बिले भरणाऱ्यांनीही हात आखडता घेतल्याने थकबाकीच्या आकड्यात भर पडत जाऊन ती ३३६ कोटी इतकी झाली आहे.

चौकट ०१

मागील तीन वर्षांतील थकबाकी

वर्ष ग्राहकसंख्या थकबाकी रक्कम

मार्च २०१९ - ११ हजार ६६० : २० कोटी ७६ लाख

मार्च २०२० - ९७ हजार १९५ : ३२ कोटी ५८ लाख

डिसेंबर २०२० - ५ लाख ७४ हजार : ३०३ कोटी ८५ लाख

चौकट ०२

थकबाकीची जिल्ह्यातील परिस्थिती

ग्राहक प्रकार संख्या थकबाकी रक्कम

घरगुती ५ लाख ४,८६० २०४ कोटी ३२ लाख

वाणिज्यिक ४८ हजार १६५ ५० कोटी

औद्योगिक १७ हजार २०५ ८२ कोटी १० लाख

एकूण ५ लाख ७४ हजार १४० ३३६ कोटी ४३ लाख

चौकट ०३

वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू होणार

गेल्या डिसेंबरपर्यंत थकबाकीचा डोंगर वाढला तरी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरू करण्यात येत आहे.

चौकट ०४

सुलभ हप्त्यांत भरा, पण बिल भरा

थकबाकीमुळे महावितरणची परिस्थिती हलाखाची झाल्याने सुलभ हप्त्यांत भरा, पण वीज बिल थकवू नका, थोडे का असेना भरा, असे आर्जव महावितरणकडून करण्यात येत आहे.

Web Title: A mountain of arrears due to the confusion of paying electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.