मिणचे येथील डोंगरास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:51+5:302021-04-02T04:24:51+5:30
दरम्यान, सिद्धोबा डोंगर हा मौजे तासगाव, मिणचे, अतिग्रे आदी गावांचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी मौजे तासगावच्या बाजूला आग लागली ...
दरम्यान, सिद्धोबा डोंगर हा मौजे तासगाव, मिणचे, अतिग्रे आदी गावांचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वी मौजे तासगावच्या बाजूला आग लागली होती. बुधवारी ही आग मिणचे गावच्या हद्दीतील मालकी क्षेत्रात लावण्यात आली आहे. याबाबत आग लागलेले क्षेत्र खासगी हद्दीत असल्यामुळे वनविभागास मर्यादा आल्या. ही आग साडेसहाच्या सुमारास लागली होती. वन विभाग, ग्रामस्थ, वडगावचे अग्निशमन दल यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालक अधिक धनवडे, प्रशांत आवळे, संभाजी जाधव, केतन धनवडे,सुशांत आवळे यांनी केले. त्यांना डॉ. अमोल पाटील, विजय मुंदाळे यांच्यासह निसर्ग प्रेमी, योग सेवा , शिवचरण स्पर्श, मिणचे ग्रामस्थ आदींनी मदत केली .या आगीत झाडे-झुडपे, सरपटणारे प्राणी, पक्षी, त्यांची घरटी यांचा अधिवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
ही आग जाणूनबुजून लावल्याची शक्यता निसर्ग प्रेमींकडून होत आहे .दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रात्री उशिरापर्यंत या आगीची नोंद पोलिसांत झाली नव्हती.
चौकट:
स्वार्थातून आग : जैवविविधतेचे नुकसान
पुढच्या वर्षी गवत चांगले येते म्हणून यावर्षी न कापलेले गवत व कापलेल्या गवतांच्या बुडक्याला आग लावण्यात येते. स्वार्थासाठी डोंगर माथ्यावर आग लावण्याचा उद्योग अज्ञानी लोकांकडून होत असतो. यामुळे नैसर्गिक जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याला जबाबदार कोण?
फोटो ओळ :
मिणचे येथील सिद्धोबा डोंगर माथ्यास आग लावण्यात आली. त्यामुळे वनसंपदा जळून खाक झाली. (छाया : संजय चव्हाण, मिणचे)