सोनगेतील युवकांच्या प्रसंगावधानतेने डोंगराची आग आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:49+5:302021-04-09T04:26:49+5:30
सोनगे गावच्या दक्षिणेला सोनगेसह बेनिक्रे, हमिदवाडा व कुरुकली या चार गावांच्या सीमा जुळलेला दीडशे एकराहून अधिक क्षेत्रात विस्तारलेल्या या ...
सोनगे गावच्या दक्षिणेला सोनगेसह बेनिक्रे, हमिदवाडा व कुरुकली या चार गावांच्या सीमा जुळलेला दीडशे एकराहून अधिक क्षेत्रात विस्तारलेल्या या डोंगरात गर्द झाडी आहे.
वनरक्षक शामराव शिंत्रे यांनी युवकांना माहिती देताच अमर पाटील सुचित शिंत्रे, सुयोग शिंत्रे सचिन शिंत्रे, सूरज शिंत्रे, नितीन शिंत्रे, आदिनाथ देवडकर, राजू लोहार, प्रवीण देवडकर, दिगंबर शिंत्रे,संकेत शिंत्रे, बबलू लोंढे, शुभम पाटील यासह अनेक युवकांनी डोंगराकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. डोंगर, जंगलांना आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. तसेच, वनराई सभोवती खंदक खोदण्यासह विविध उपाययोजना कराव्यात.
-अमर पाटील
वनमित्र, सोनगे
कॅप्शन
सोनगे येथील डोंगराला लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर सुटकेचा श्वास घेताना युवक.
(छाया - रोहित लोहार, सोनगे)