चिमुकल्याच्या आकस्मित मृत्यूने गावात पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:33 IST2021-11-07T19:32:59+5:302021-11-07T19:33:24+5:30
Death of Kid : येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले.

चिमुकल्याच्या आकस्मित मृत्यूने गावात पसरली शोककळा
सरवडे : येथील वेदांत रणजित खोराटे या साडेचार वर्षांच्या बालकाचा दिवाळी सणातच काल शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. शांत चपळ अशा वेदांतच्या मृत्यूने गावासह परिसरात मनाला चटका लावणारा ठरला. जिव्हाळा लावलेल्या वेदांतच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
येथील ठेकेदार बापूसो जयसिंग खोराटे यांचा नातू व रणजित बापूसो खोराटे यांचा मुलगा वेदांत याच्या काल रात्री अचानक सौम्य स्वरुपात पोटात दुखू लागले. त्याला तात्काळ दवाखान्यात नेले. औषधे घेतल्यानंतर त्याला बरे वाटले. त्यानंतर तो खेळू लागला. तर फटाकेही वाजवले. रात्री तो नेहमी प्रमाणे झोपी गेला. परंतु पहाटे तीनच्या सुमारास तो अस्वस्थ झाला.
उपचारासाठी त्याला मुरगूड येथे नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तो मृत घोषित केले. लहान मुले मोबाईल पहाण्यात गुंग असताना वेदांत सायकल फिरवणे,बालमित्रांना घेऊन नेहमीच मातीतील खेळ खेळत असे तर गाय,म्हैस बैल यांच्यां जवळ जाणे त्यांना फिरवणे असा छंद त्याला होता. कायम हसत खेळत असणार्या वेदांतचा छोट्याश्या दुखण्याने अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, पणजी,आत्या व मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार ८ नोव्हेंबर रोजी आहे.