गरजूंच्या मुखी ‘रॉबीन हूड आर्मी’चा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:55 AM2017-07-24T00:55:08+5:302017-07-24T00:55:08+5:30

गरजूंच्या मुखी ‘रॉबीन हूड आर्मी’चा घास

The mouth of the needy 'Robin Hood Army' | गरजूंच्या मुखी ‘रॉबीन हूड आर्मी’चा घास

गरजूंच्या मुखी ‘रॉबीन हूड आर्मी’चा घास

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : संततधार पाऊस, पूर परिस्थितीमुळे तावडे हॉटेल परिसरातील झोपड्यांना पाण्याचा वेढा पडलेला. झोपड्यांमधील चुली पाण्यात बुडल्याने रहिवाशांच्या आणि त्यांच्या मुलाबाळांच्या खाण्याचा प्रश्न आवासून उभा. पोटाची आग कशी विझवायची अशा विवंचनेत असतानाच मसाले भात, पुलाव आणि शिऱ्याच्या प्लेट समोर आल्या.
शहरातील रॉबीन हूड आर्मीच्या अशा ड्राईव्हने अनेक भुकेल्यांना दोन घास मिळत आहेत. अन्नाची होणारी नासाडी टाळत गरजूंपर्यंत पोषक आहार पोहोचवण्याचे काम सुरू आहे. रविवार, सुटीच्या दिवशी स्वयंसेवक हिरवा टी. शर्ट परिधान करून अन्नपदार्थ घेऊन शहरातील वाटसरू, बेघर, कोणीही उपाशी झोपू नये म्हणून त्याच्यापर्यंत अन्न पोहचवतात. या उपक्रमास हॉटेल व्यावसायिक लग्न, कार्यक्रमांचे आयोजकांची मदत होते. दोन दिवसापूर्वी रॉबीन्सनी तावडे हॉटेल परिसरातील ७० ते ९० लोकांना अन्नदान केले. या उपक्रमात योगेश कोळी, अमित परमार, शुभदा वारके, विजय जोशी, शिवाजी हालाडे, प्रतीक जोशी, मुद्सार नदाफ, सुधीर लोंढे, अमोल विचारे, चेतन मोरे, अखिल सय्यद, आकांक्षा, प्रणोती खाडे, प्रशांत मोहिते, प्रदीप कुलकर्णी, असिफ पटेल, आकाश शेट्टी, विनायक सुतार, डॉ.वणकुंद्रे, विजय पाटील, गीता हसुरकर सहभागी झाले होते.
काय आहे रॉबीन हूड आर्मी
४रॉबिन हूड आर्मी ही संकल्पना नील व आनंद यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये सुरू केली. हॉटेल , लग्न, पार्टी मध्ये जे अन्न वाया जाते, ते अन्न जमा करायचे व ते गरजूंपर्यंत पोहोचवले जाते. अनेकांच्या सहकार्याने रॉबीन्सचे कार्य सुरू आहे. ११ राज्ये, ४१ शहर परिसरात ९००० रॉबिन्स कार्यकर्ते कार्यरत आहेत. आतापर्यंत दोन कोटी लोकांपर्यंत अन्न पोहोचवले आहे.
कोल्हापूरमध्ये अमित व योगेश यांनी २९ एप्रिल २०१७ रोजी रॉबिन्सची सुरुवात केली. यामध्ये सध्या २०० रॉबिन्स कार्यकर्ते कार्यरत असून काही दिवसात ४००० गरजूंपर्यंत अन्न पोहोचवले आहे. रॉबिन्स रोज वेगवेगळ्या हॉटेल, लग्न कार्यालये व कॅटरर्स यांना भेटतात आणि त्यांच्याकडून अन्न शिल्लक असेल तर आवाहन करतात.
रॉबिन हूड आर्मी 3 नियमावर काम करते. आर्थिक मदत स्वीकारत नाही, जी काही मदत असेल ती फक्त अन्न, कपडे या स्वरूपात असते. हेतू हा अन्नाची नासाडी रोखणे हा आहे. त्यामुळे अन्न घेण्याची ग्वाही दिल्यानंतर ते आम्ही घेतोच व ते गरजूपर्यंत पोहोचवले जाते. कोणतेही अन्न स्वीकारण्याआधी आमचे रॉबिन्स ते अन्न स्वत: खाऊन बघतात व जर ते खाण्यायोग्य असेल तरच ते घेतले जाते, अथवा नाकारले जाते. तुम्हीसुद्धा या उपक्रमाला अन्नाच्या स्वरूपात सहकार्य करून भुकेलेल्यांना अन्नदान करू शकता. त्यासाठी रॉबीन हूड आर्मीच्या अमित यांच्याशी संपर्क साधू शकता.

Web Title: The mouth of the needy 'Robin Hood Army'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.