खत दरवाढ विरोधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:09+5:302021-05-20T04:26:09+5:30

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. ...

Movement against fertilizer price hike | खत दरवाढ विरोधी आंदोलन

खत दरवाढ विरोधी आंदोलन

Next

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ करून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केलीय. एका हाताने दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले. खताची दरवाढ करून दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांकडून पैसे काढून घेतले जात आहेत.रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राधानगरी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सुशिल पाटील कौलवकर युवा मंच व तालुका काँग्रेस (आय) च्या वतीने निवेदनाद्वारे राधानगरीचे तहसीलदार मीना निंबाळकर यांना देण्यात आला.

निवेदनात असे म्हटले आहे, केंद्र शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या डीएपी, युरिया, मिश्र खत अशा रासायनिक खतांच्या किमतीत दीड पटीने वाढ केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांनी आधीच कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या काळात खताची दरवाढ करून शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच कोरोना काळात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला कवडीमोल किंमत मिळत आहे. शेतीमाल जागेवर कुजत पडला आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला असतानाच शेतीला लागणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढविणे चुकीचे आहे. अन्यायी दरवाढ तत्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील यांनी दिला आहे.

भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संचालक संजयसिंह पाटील, माजी सरपंच सागर धुंदरे, पंचायत समितीचे सदस्य उत्तम पाटील (येळवडेकर),शहाजी कवडे, सरपंच सुभाष पाटील, राहुल चौगले,रवी पाटील तारळेकर,दिगंबर येरूडकर,वैभव तहसीलदार,प्रभाकर पाटील (चंद्रेकर) इंद्रजित पाटील,बाजीराव चौगले, अमर वनकुंद्रे, आदी यावेळी उपस्थित होते.

फोटो ओळी :

केंद्र सरकारने खत दरवाढ केली. त्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुका कॉंग्रेसच्यावतीने आदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सुशील पाटील, सदाशिवराव चरापले, संजय पाटील, प्रभाकर पाटील आदी.

Web Title: Movement against fertilizer price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.