सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ च्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:17 AM2020-12-27T04:17:17+5:302020-12-27T04:17:17+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दारात, कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करणार असल्याची ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दारात, कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने मराठ्यांविरोधात भूमिका घेतली जाते. मोर्चे काढत आहेत, न्यायालयात आव्हान देऊन समाजाला अडचणीत आणू पाहत आहेत. वास्तविक त्यांचा राज्यातील आरक्षणाचा काहीही संबंध नाही. तरीही मराठ्यांना त्रास देत आहेत. या मंडळींच्या घरासमोर, कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे. एकूणच आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी योग्य भूमिका पार पाडली नसल्याने आज समाजावर ही वेळ आल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावेळी सचिन तोडकर, प्रसाद जाधव, वीरेंद्र मोहिते, प्रसाद खोत, विवेक कुबल आदी उपस्थित होते.
‘ईडब्लूएस’लागू करणाऱ्या सरकारचा निषेध
राज्य सरकारने मराठा समाजाला ‘ईडब्लूएस’ आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सर्वेाच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेवर परिणाम होऊ शकतो, असे ज्येेष्ठ वकिलांचे म्हणणे असल्याचे दिलीप पाटील यांनी सांगितले,
-राजाराम लोंढे