पेन्शनरांचे गांधीगिरीने आंदोलन
By admin | Published: September 16, 2014 12:20 AM2014-09-16T00:20:55+5:302014-09-16T00:38:02+5:30
बँकेतील कर्मचाऱ्यांना गुलाब फूल देऊन सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने
कोल्हापूर : सर्व पेन्शनरांशी बँकेतील कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे, अशी मागणी करत बँकेतील कर्मचाऱ्यांना गुलाब फूल देऊन सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने महाद्वार रोड येथील बँक आॅफ इंडिया येथे गांधीगिरी मार्गाने आज, सोमवारी आंदोलन केले.
यावेळी ए. व्ही. कुलकर्णी म्हणाले, इ.पी.एस. ९५ च्या असंख्य पेन्शनरांची खाती आपल्या शाखेत आहेत. आयुष्यभर आम्ही सन्मानाने नोकरी करून निवृत्त झालो आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला अत्यल्प पेन्शन मिळते याचा अर्थ आम्ही गरीब आहोत, पण लाचार नाही. बँकेत येणाऱ्या प्रत्येक पेन्शनरांशी तुम्ही व्यवस्थित बोला, बँकेत आल्यानंतर व्यवस्थित माहिती द्या, त्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, अशी आमची मागणी आहे.
यावेळी बी. पी. भोसले, प्रकाश जाधव, बी. एन. काटकर, विलास चव्हाण, सुभाष सावंत, आदी उपस्थित होते.