मेडिक्लेम योजना पूर्ववत न केल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:33+5:302021-09-02T04:53:33+5:30

म्हाकवे : माध्यान्ह भोजन योजना महत्त्वपूर्ण आहेच;परंतु त्याबरोबर बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची कवचकुंडले ठरलेली मेडिक्लेम योजनाही राज्य शासनाने तात्काळ ...

Movement if Mediclaim plan is not revoked | मेडिक्लेम योजना पूर्ववत न केल्यास आंदोलन

मेडिक्लेम योजना पूर्ववत न केल्यास आंदोलन

Next

म्हाकवे : माध्यान्ह भोजन योजना महत्त्वपूर्ण आहेच;परंतु त्याबरोबर बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची कवचकुंडले ठरलेली मेडिक्लेम योजनाही राज्य शासनाने तात्काळ सुरू करावी. अन्यथा राज्यातील बांधकाम कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष काॅ. शिवाजी मगदूम यांनी दिला आहे.

आणूर (ता. कागल) येथील बांधकाम कामगारांना शासनाच्या माध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा आनंदा तोडकर होत्या. प्रास्ताविक कॉ. राजू आरडे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष काॅ. विक्रम खतकर, काॅ. मोहन गिरी, आनंदा तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुरगूड शहराध्यक्ष प्रकाश रामाणे, ग्रामसेविका स्मिता तळेकर, प्रकाश माने आदी उपस्थित होते. बाळासाहेब कापडे यांनी आभार मानले.

...तर संघटना स्वस्थ बसणार नाही : मगदूम

लाल बावटा संघटनेचे नाव सांगत काहीजण कामगारांच्या बोगस नोंदणी करत आहेत. यामुळे संघटनेला गालबोट लागत आहे. संबंधितांनी ती तात्काळ थांबवावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही काॅ. मगदूम यांनी दिला आहे.

Web Title: Movement if Mediclaim plan is not revoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.