भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलन
By admin | Published: April 11, 2017 06:51 PM2017-04-11T18:51:11+5:302017-04-11T18:51:11+5:30
विशिष्ट वर्गातील पदामध्ये घट केल्याचा निषेध
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : कर्मचारी भविष्य निधी संगठन (ईपीएफओ) या देश पातळीवरील संगठनेमधील गुप बी,सी,डी मधील देशभरातील २२०० कर्मचारी काल सोमवारपासून सुरु झाले. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी कोल्हापूरात ताराबाई पार्क येथील उपक्षेत्रीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
या संगठनेच्या कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. ईपीएफओ ही देशातील व आठ कोटी संघटित कामगारांसाठी प्रॉव्हिंडेंट फंड,पेन्शन व विम्याचे लाभ या सारखी सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी मोठी संघटना आहे.
सध्या या संघटनेमध्ये वर्ग -एक च्या अधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक आर्थिक लाभासाठी /पदोन्नती यासाठी कोणत्याही सरकार एजन्सी किंवा तज्ज्ञ लोकांची एजन्सी मार्फत समिती गठीत न करता पुर्वग्रहदुषितपणाने १४ जुलै २०११ ला सीबीटी च्या ७२ वा बैठकीत विभागीय आयुक्त -१ च्या १८० व विभागीय आयुक्त -२ च्या विविध पदांची निर्मिती करुन संघटनेमधून १९१८ कोटी रुपयांचा लाभ करुन घेतलेला आहे.
या संगठनेमधील मुख्य कार्य करणाऱ्या गु्रप बी,सी,डी,डीपीए,डीर्ईओ यांना कोणताही आर्थिक लाभ /पदोन्नती न देता त्यांच्या पदामध्ये घट करण्यात आली. आॅल इंडिया ई.पी.एफ, स्टाफ फेडरेशनने वेळोवेळी कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय, व केंद्रीय भविष्य निधी आयुक्त यांच्याबरोबर बोलणी करुन फक्त विशिष्ट वर्ग -१ पदांना लाभ न देता सर्वांचा विचार व्हावा ही विनंती केली.पण,केंद्रीय भविष्य निधी आयुक्तांनी फेडरेशनच्या सर्व न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष केले.