गांधीनगरात सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:25+5:302021-06-11T04:16:25+5:30

जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक व्यवसायास सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीमध्ये व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिलेली आहे. पण कापड ...

Movement to start all businesses in Gandhinagar | गांधीनगरात सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी आंदोलन

गांधीनगरात सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी आंदोलन

Next

जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक व्यवसायास सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधीमध्ये व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिलेली आहे. पण कापड आणि इतर व्यवसायाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक व्यवसायाबरोबर इतर व्यावसायिकांना व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे व्याज आणि इतर खर्च चालूच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी व्यापाऱ्यांनी केली. या आंदोलनात होलसेलचे अध्यक्ष पप्पू अहुजा, उपाध्यक्ष अशोक टेहलानी, भाजपचे शहराध्यक्ष विनोद अहुजा, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष मनोज बचरानी, सिंधी कौन्सिलचे श्रीचंद पंजवानी, गोपालदास निरंकारी, मसाई सेनेचे जिल्हाध्यक्ष कुमार गुरबानी, विनोद हुजूरानी, विक्रम मोहिते, रिकी सचदेव आदी व्यापारी उपस्थित होते.

चौकट : गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर गुरूनानक पेट्रोलपंपापासून ते बसस्टॉपपर्यंत होलसेल व्यापारी आपल्या दुकानासमोर हातामध्ये व्यापाऱ्यांच्या दशा आणि दिशा दर्शवणारे फलक घेऊन उभे होते. 'व्यापारी जगवा रोजगार वाचवा', 'मत छिनो हमारा कारोबार, हमारा भी है घर परिवार' असे फलक आपल्या हातामध्ये घेऊन एक तासाचे आंदोलन केले.

फोटो : १० गांधीनगर आंदोलन

ओळ- १) गांधीनगर मुख्य रस्त्यावर होलसेल व्यापारी असोसिएशनने सर्व व्यवसाय सरसकट चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी आंदोलन केले या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग सहभागी झाला होता. (छाया बाबासाहेब नेर्ले)

२) आपल्या दुकानासमोर व्यापाऱ्यांची व्यथा सांगणारा फलक घेऊन उभा असलेला एक व्यापारी.

Web Title: Movement to start all businesses in Gandhinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.