निवासराव साळोखे यांनी उभारलेली चळवळ पुढे नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:28+5:302021-09-02T04:53:28+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे (तात्या) यांनी वीजबिल माफी, घरफाळा वाढ रद्द आणि हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी ...

The movement started by Nivasrao Salokhe will continue | निवासराव साळोखे यांनी उभारलेली चळवळ पुढे नेणार

निवासराव साळोखे यांनी उभारलेली चळवळ पुढे नेणार

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे (तात्या) यांनी वीजबिल माफी, घरफाळा वाढ रद्द आणि हद्दवाढ झालीच पाहिजे यासाठी उभारलेली चळवळ आणि लढा पुढे नेण्याचा निर्धार कोल्हापुरातील सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी केला. येथील बालगोपाल तालमीत आयोजित शोकसभेत त्यांनी साळोखे यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रकांत जाधव होते.

टोलविरोधी चळवळीला तात्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. कोल्हापूरकरांच्या विविध प्रश्नांवरील चळवळींचे त्यांनी सर्वांना सामावून घेऊन नेतृत्व केले. एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला आपण मुकलो आहोत. त्यांनी उभारलेली चळवळ पुढे नेणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरणार असल्याची भावना आमदार जाधव यांनी व्यक्त केली. तात्यांनी उभारलेल्या लढ्याचा पाठपुरावा आपण सर्व कार्यकर्त्यांनी करूया, असे आवाहन माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले. एखाद्या सामाजिक प्रश्नावरील आंदोलनाबाबत तात्यांनी भूमिका घेतली की, त्यावर ते ठाम असायचे. त्यांचे स्मारक उभारायचे असल्यास निव्वळ शोकसभेत बोलून चालणार नाही. कृती करणे आवश्यक असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले. बालगोपाल, बाराईमाम तालमीला तात्यांचा आधार होता. जनआंदोलनात ते पुढे असायचे. त्यांनी उभारलेली चळवळ पुढे नेऊया, असे आदिल फरास यांनी सांगितले. भगवानराव काटे, सतीशचंद्र कांबळे, नंदकुमार वळंजू, अशोक पोवार, आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी सुभाष जाधव, माणिक मंडलिक, बाबा पार्टे, सुरेश जरग, बाबुराव कदम, जयकुमार शिंदे, उत्तम कांबळे, राजू कुरणे, कुलदीप साळोखे, अमरदीप कुंडले, लालासो गायकवाड, रमेश मोरे, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते.

चौकट

तालमींमध्ये एकोपा निर्माण केला

शहरामध्ये कॉग्रेस उभारणीत निवासराव साळोखे यांनी योगदान दिले. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी पान-सुपारी कार्यक्रमाद्वारे तालमींमध्ये एकोपा निर्माण करण्याच्या आठवणीला ॲड. महादेव आडगुळे यांनी उजाळा दिला. खंडपीठाच्या आंदोलनाला तात्यांनी मार्गदर्शनासह पाठबळ दिल्याचे ॲड. शिवाजीराव राणे यांनी सांगितले.

फोटो (०१०९२०२१-कोल-निवासराव साळोखे शोकसभा) : कोल्हापुरात बुधवारी बालगोपाल तालमीतील शोकसभेत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे यांना आदरांजली वाहिली. यावेळी डावीकडून बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, महेश जाधव, महादेवराव आडगुळे, आदिल फरास, आर. के. पोवार, उत्तम कांबळे, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

010921\01kol_36_01092021_5.jpg

फोटो (०१०९२०२१-कोल-निवासराव साळोखे शोकसभा) : कोल्हापुरात बुधवारी बालगोपाल तालमीतील शोकसभेत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवासराव साळोखे यांना आदरांजली वाहिली. यावेळी डावीकडून बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, महेश जाधव, महादेवराव आडगुळे, आदिल फरास, आर. के. पोवार, उत्तम कांबळे, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: The movement started by Nivasrao Salokhe will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.