वडगावात ‘स्वाभिमानी’च्या हालचाली

By admin | Published: June 21, 2016 01:04 AM2016-06-21T01:04:02+5:302016-06-21T01:16:58+5:30

नगरपालिका निवडणूक : प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

Movement of 'Swabhimani' in Wadga | वडगावात ‘स्वाभिमानी’च्या हालचाली

वडगावात ‘स्वाभिमानी’च्या हालचाली

Next

सुहास जाधव -- पेठवडगाव -आगामी वडगाव नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, यासाठी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांनी सूचना दिल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी माने, सत्वशील जाधव, संतोष जाधव, वैभव कांबळे, आदी प्रमुख नेत्यांच्या काही इच्छुक नागरिकांसोबत बैठका सुरू आहेत़
वडगाव शहराने लोकसभा निवडणुकीसाठी खासदार राजू शेट्टी यांना चांगले मताधिक्क्य दिले़ या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर विश्वास असल्याचे सिद्ध झाले होते़ त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीवेळीदेखील चांगली मते मिळाली होती. या नगरपालिका निवडणुकीत संघटनेसह युवकांनी सक्रिय व्हावे, असे आदेश खासदार शेट्टी आणि खोत यांनी कार्यकर्त्यांना दिले़ त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठकही पार पडली़ यात १७ जागांवर उमेदवारांबाबत चाचपणी करण्यात आली.
यावेळी नगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली़ स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला़, अशी माहिती पक्ष नेतृत्वाला देण्यात आली आहे़ त्यादृष्टीने कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले.
खासदार शेट्टी, आमदार खोत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत़ शहर विकासाला गती, पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे़ पालिका निवडणुकीचा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरदेखील परिणाम होऊ शकतो. जयसिंगपूर, कुरुंदवाड, आदी पालिका निवडणुकीत स्वाभिमानीला अपेक्षित यश मिळाल्यास त्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत फायदा होण्याची आशा पक्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे पेठवडगावमध्ये नेहमी दुरंगी होणाऱ्या निवडणुकीत यावेळी आणखी एका पक्षाची भर पडण्याची शक्यता आहेत.

काही जागांवर डाव...
पेठवडगाव शहरामध्ये स्वाभिमानीचे हमखास असे हक्काचे मतदार नसले तरी विधानसभा, लोकसभेत पक्षाच्या बाजूने भरभरून मतदान झाले आहे. या बळावरच पालिका निवडणुकीत काही जागा पदरात पाडून घेता येऊ शकतात. त्यादृष्टीने प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Movement of 'Swabhimani' in Wadga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.