प्रचलित नियमानुसार वेतनासाठी शिक्षकदिनी विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:57+5:302021-09-06T04:28:57+5:30

या प्रमुख मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने राज्यभर ‘काळा शिक्षक दिन’ आंदोलन करण्यात आले. या शिक्षकांचे १७५ वे आंदोलन रविवारी ...

Movement of unsubsidized teachers on Teacher's Day for salary as per prevailing rules | प्रचलित नियमानुसार वेतनासाठी शिक्षकदिनी विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन

प्रचलित नियमानुसार वेतनासाठी शिक्षकदिनी विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन

googlenewsNext

या प्रमुख मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांच्या वतीने राज्यभर ‘काळा शिक्षक दिन’ आंदोलन करण्यात आले. या शिक्षकांचे १७५ वे आंदोलन रविवारी झाले. कोल्हापुरातील आंदोलनकर्त्यांनी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आसगावकर यांना निवेदन दिले. त्यावर राज्यातील विना अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळवून देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडी शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून विना अनुदानित शिक्षकांना यापुढील काळात वेतन अनुदानासाठी आंदोलन करण्याची गरज भासणार नसल्याची ग्वाही आमदार आसगावकर यांनी दिली. यावेळी प्रकाश पाटील, गजानन काटकर, व्ही. एच. सपाटे,पांडुरंग पाटील, राजू भोरे, जनार्दन दिंडे, रामराजे सुतार, यशराज गाडे, सावता माळी, नेहा भुसारी, जयश्री पाटील, दीपक वसावे, अविनाश पाटील, विष्णू पाटील, राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, अण्णासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

चौकट

उद्या बैठक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या समवेत विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांची मंगळवारी (दि. ७) बैठक आहे. त्यामध्ये विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे आमदार आसगावकर यांनी सांगितले.

फोटो (०५०९२०२१-कोल-विनाअनुदानित शिक्षक) : कोल्हापुरात रविवारी वेतनाबाबतच्या मागणीचे निवेदन राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जयंत आसगावकर यांना दिले.

050921\05kol_7_05092021_5.jpg

फोटो (०५०९२०२१-कोल-विनाअनुदानित शिक्षक) : कोल्हापुरात रविवारी वेतनाबाबतच्या मागणीचे निवेदन  राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने आमदार जयत आसगावकर यांना दिले.

Web Title: Movement of unsubsidized teachers on Teacher's Day for salary as per prevailing rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.