अपंगत्वाच्या साथीने चित्रपट : भांडगे

By admin | Published: December 24, 2014 11:47 PM2014-12-24T23:47:25+5:302014-12-25T00:02:27+5:30

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, बुधवारी भांडगे यांनी ‘इंगळे मार्ग’ या कन्नड चित्रपटाविषयी रसिकांशी संवाद साधला.

Movies with Disabilities: Bhaguje | अपंगत्वाच्या साथीने चित्रपट : भांडगे

अपंगत्वाच्या साथीने चित्रपट : भांडगे

Next

कोल्हापूर : ‘विशिष्ट ध्येयाने पछाडलो की सगळे अडथळे सहज पार करण्याची ताकदही येते, मग तो अडथळा अपंगत्वाचा असला तरी...’ या शब्दात सामाजिक भान जपणाऱ्या चित्रपटांचीच निर्मिती करण्याचा ध्यास घेतलेले कन्नड दिग्दर्शक घनश्याम भांडगे यांनी आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपट कलाकृतीच्या निर्मितीची कथा उलगडली.
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज, बुधवारी भांडगे यांनी ‘इंगळे मार्ग’ या कन्नड चित्रपटाविषयी रसिकांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते.
ते म्हणाले, माझ्या चित्रपटांतून सामाजिक संदेश देता येईल असाच विषय मी हाताळतो. ‘इंगळे मार्ग’ हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडातील जातीय विषमतेवर भाष्य करतो. या विषमतेचा प्रतिकार करणाऱ्या शिक्षकाचा लढा यात दाखविला आहे. या पहिल्याच चित्रपटाला कर्नाटकातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गेले शंभर दिवस हा चित्रपट हाउसफुल्ल गर्दी खेचत आहे.
दरम्यान, आज महोत्सवात रसिकांनी क्लोजिंग द रिंग, द होस्ट, इंगळे मार्ग, अग्निपंख, हॅपी न्यू इयर मदर, अग्लया, सेव्हन रोशन व्हिला, मॅन्युुस्क्रिप्टस डोंट बर्न, टेक शेल्टर, अपूर पांचाली, लाईट रेल, देवकीनंदन गोपाला या चित्रपटांचा आस्वाद घेतला.
यावेळी भांडगे यांनी राजर्षी शाहू महाराजांवर चित्रपट करण्याचा मनोदय व्यक्त केला. शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे किंवा एका राज्याचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यांनी केलेल्या कार्यावर मी अभ्यास करीत असून ते जगभर पोहोचावे यासाठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


महोत्सवात आज
स्क्रीन नं १ : अपूर पांचाली (बंगाली), द गॅॅँ्रड बुडापेस्ट हॉटेल (युएसए), बेस्टस आॅफ द सदर्न वाईल्ड, अप साइड डाउन (मराठी), गोल्ड अ‍ॅँड कॉपर .
स्क्रीन नं २ : आर्टिस्ट (मल्याळम), अग्निपंख (मराठी), कँडल मार्च (मराठी), लाईक फादर लाईक सन (जपान), द होस्ट (साउथ कोरिया).
स्क्रीन नं ३ : सिटी मंकीज (चायना), अ सेपरेट वाइंड (मेक्सिको), किताब (हिंदी), आर्टिस्ट (मल्याळम).

Web Title: Movies with Disabilities: Bhaguje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.