माधव शिंदे जन्मशताब्दी सोहळ््यात चित्रपटांची पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 06:52 PM2017-05-11T18:52:42+5:302017-05-11T18:52:42+5:30
आशा काळे, हदयनाथ मंगेशकर येणार, रविवारपासून प्रारंभ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : माधव शिंदे कुटुंबीय, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने रविवार (दि. १४)पासून सुरू होणाऱ्या चित्रसाधक माधव शिंदे जन्मशताब्दी महोत्सवात रसिकांना त्यांच्या पाच चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ््यास ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी चित्रदृश्य प्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे. या सोहळ््यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता ‘गृहदेवता’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सोमवारी (दि. १५) ‘शिकलेली बायको’, मंगळवारी (दि. १६) ‘कन्यादान’, बुधवारी (दि. १७) ‘माणसाला पंख असतात’ व गुरुवारी (दि. १८) ‘धर्मकन्या’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
शनिवारी (दि. २०) सायंकाळी सहा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात महोत्सवाची सांगता होईल. यावेळी प्रमुख पाहुणे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते ‘चित्रसाधक’ या स्मृतिअंकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर गीतमाधव हा माधव शिंदे यांच्या चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात महेश सोनुले, प्रसेनजीत कोसंबी, अभिजीत कोसंबी आणि सहकलाकार गीतांचे सादरीकरण करणार आहेत तरी रसिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.