चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल

By admin | Published: March 23, 2015 09:24 PM2015-03-23T21:24:16+5:302015-03-24T00:18:41+5:30

एक अनोखा उपक्रम : अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिनी ३०० बसस्थानके होणार स्वच्छ

Moving towards the corporate world of Chakote Group | चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल

चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल

Next

जयसिंगपूर : ग्रामीण भागात व्यवसाय सुरू करून बेकरीला औद्योगिक दर्जा देऊन रोजगार निर्माण करून देणाऱ्या चकोते ग्रुपची कार्पोरेट जगताकडे वाटचाल सुरू आहे. चकोते ग्रुपची उत्पादने महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यांत लोकप्रिय बनली आहेत. ग्रामीण उद्योजक तरुणांना प्रेरणास्थान ठरलेले चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, गणेश बेकरी नांदणीचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांचा आज, मंगळवारी ४१ वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प चकोते यांनी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत चकोते ग्रुपकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत
एकाच दिवशी ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. गेल्या २५ वर्षांत सामाजिक नीतीमूल्ये जपत चकोते ग्रुपने विकासाच्या वाटेवर दमदार पाऊल टाकले आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेश या चार राज्यांत गणेश बेकरीची उत्पादने पोहोचली असून, नांदणी व लातूर येथे दोन युनिट उभारण्यात आले आहेत. ‘आयएसओ’ मानांकन मिळालेल्या बेकरीचे उत्पादन आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन अण्णासाहेब चकोते यांची पुन्हा ‘आॅल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन दिल्ली’ या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे. सामाजिक बांधीलकीतून विविध उपक्रम या उद्योग समूहामार्फत राबविले जातात. शैक्षणिक उपक्रमातून ग्रामीण मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून इंग्लिश स्कूलची स्थापना करून ज्ञानदानाच्या कार्यातून वेगळेपण निर्माण केले आहे. चकोते ग्रुपने २०१३ च्या भीषण दुष्काळात सांगली जिल्ह्यातील डफळापूर हे गाव पाणी व चाऱ्यासाठी दत्तक घेऊन सामाजिक बांधीलकी जपली होती. उद्योगातील यशस्वी वाटचालीबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य ते मोठ्या जोमाने करीत आहेत. सामाजिक कार्य करीत असताना प्रत्येक वाढदिनी एक नवीन विधायक व समाजाला दिशा देणारा उपक्रम राबविण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आहे.


विविध कार्यक्रम
यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेला ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिनी महाराष्ट्र व सीमाभागातील २४ जिल्ह्यातील ३०० बसस्थानकांवर सकाळी आठ ते दहा या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये चकोते ग्रुपचे जवळपास दहा हजार लोक सहभागी होणार असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी ३०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फळेवाटप, रस्ता लोकार्पण कार्यक्रम, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सामाजिकतेचा पैलू
केवळ जिद्दीच्या जोरावर गणेश बेकरीची सुरुवात करणाऱ्या अण्णासाहेब चकोते यांचा प्रवास नवोदित उद्योजकांना प्रेरणादायी ठरला आहे. महाराष्ट्र व सीमाभागातील ३०० बसस्थानके चकाचक करून त्यांच्या सामाजिकतेचा आणखी एक पैलू या निमित्ताने पुढे येणार आहे. ‘करूया स्वच्छता, जपूया आरोग्य, घडवूया स्वच्छ भारत’ हा नारा राज्यात आदर्शवत ठरणार आहे.

Web Title: Moving towards the corporate world of Chakote Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.