खासदार डॉ. अमोल कोल्हे 'झाडाखालचा वडापाव' खायला जातात तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 01:02 PM2021-11-21T13:02:23+5:302021-11-21T13:18:52+5:30
कोल्हापूर : खाण, राहणं असो वा कोणतीही गोष्ट कोल्हापूरकरांचा नादच निराळा. कोल्हापूरला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसं येथील खाद्य ...
कोल्हापूर : खाण, राहणं असो वा कोणतीही गोष्ट कोल्हापूरकरांचा नादच निराळा. कोल्हापूरला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसं येथील खाद्य संस्कृतीही फेमस आहे. तांबडा- पांढर रस्सा, मिसळ असो व्वा कोणताही पदार्थ खवय्या त्या पदार्थाच्या प्रेमातच पडतो. चमचमीत आणि झणझणीत खायचं तर ते कोल्हापुरातच अस पर्यटकांच एक मत आहे. हीच येथील खाद्यपदार्थाची चव चाकण्याचा मोह अभिनेते आणि खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनाही आवारता आला नाही. इतकच नाही तर त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर यांची पोस्ट लिहित कोल्हापूरच्या वास्तव्यातील काही आठवणीही जागवल्या.
कोल्हापुरातली प्रसिद्ध असलेल्या झाडाखालील वड्याची चव चाकत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. '‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’च्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी झाडाखालील वड्याची चव चाकली आणि त्यावर पोस्टही लिहिली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, कोल्हापूरकरांसाठी परिचित असणारं नाव 'झाडाखालचा वडापाव.' ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या प्रेस कॉन्फरन्स च्या निमित्ताने कोल्हापूर ला जाणं झालं. आणि २०१५ सालच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या..याच ठिकाणी खरंतर जगदंब क्रिएशन्सच्या निर्मितीची सुरवात झाली होती, जेव्हा कोल्हापूरात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्तानं २०१५ मध्ये गेलो होतो. आणि रोज सकाळचा नित्यक्रम होता तो म्हणजे 'झाडाखालचा वडापाव' ला जाऊन कट वडा खायचा..!
आता झाडाखालचा वडापावचं बदललेलं रूप पाहिलं आणि आनंदाची / कौतुकाची गोष्ट अशी आहे की चव आणि क्वालिटी तशीच आहे..आणि जी व्यावसायिक भरारी याचे मालक शौकत मुकादम यांनी घेतली आहे, ती अभिनंदनीय आहे.. पुन्हा एकदा झाडाखालच्या वडापावची चव चाखताना शौकत मुकादम यांचं यश हे डोळ्यासमोर दिसत होतं..आणि या कष्टाचं आणि मेहनतीचं कौतुक करावंसं वाटलं..पुन्हा एकदा कोल्हापूरच्या वास्तव्यातील आठवणी जाग्या झाल्या..!