खासदार संभाजीराजे यांची बिकानेर पुराभिलेखागारास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:31+5:302021-03-22T04:22:31+5:30
पुरंदरच्या तह तहान्वये महाराजांना २३ किल्ले आणि चार लक्ष होन उत्पन्नाचा मुलुख मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. या तहाची संपूर्ण ...
पुरंदरच्या तह तहान्वये महाराजांना २३ किल्ले आणि चार लक्ष होन उत्पन्नाचा मुलुख मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. या तहाची संपूर्ण कलमे असणारा अस्सल तहनामा सुमारे २२ फूट लांबीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा भेट, औरंगजेबासमोर दरबारात महाराजांनी दाखविलेला स्वाभिमान आणि करारी बाणा, आग्रातून महाराजांनी करून घेतलेली ऐतिहासिक सुटका या सर्व घडामोडींचे वर्णन करणारी मुघल दरबारातील जयपूरचा वकील परकालदास यांच्या अस्सल समकालीन पत्रांचीदेखील खासदार संभाजीराजे यांनी पाहणी केली. यावेळी राजस्थान राज्य पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत उपस्थित होते.
प्रतिक्रिया
राजस्थान सरकारने हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा अत्यंत काळजीपूर्वक व तितक्याच अभिमानाने जपलेला आहे, याबाबत त्यांचे विशेष कौतुक करतो, आभार मानतो. महाराष्ट्र शासनाने देखील आपल्या इतिहासाशी संबधित असलेली अशी प्रकाशित, अप्रकाशित कागदपत्रे लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करावीत.
-खासदार संभाजीराजे
फोटो (२१०३२०२१-कोल-खासदार संभाजीराजे ०१, ०२) : राजस्थानमधील बिकानेर पुराभिलेखागारास खासदार संभाजीराजे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी राज्य पुराभिलेखागाराचे संचालक डॉ. महेंद्र खडगावत उपस्थित होते.