"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:59 AM2024-07-16T10:59:33+5:302024-07-16T11:01:25+5:30

Kolhapur : विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर खासदार शाहू छत्रपती यांनी हिसेंच्या घटनेचा निषेध केला.

MP Shahu Maharaj Chhatrapati clarified his stance on the Vishalgad violence case | "अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

"अतिक्रमण हटवलं तर चांगलेच"; विशाळगड हिंसा प्रकरणावरून शाहू छत्रपती यांची नाराजी

Vishalgad Encroachment : कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे  हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन  केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यावरुनच खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपती हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी हे हे प्रशासनानचे अपयश असल्याचे म्हटलं. 

रविवारी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले होते. त्यानंतर घोषणाबाजी सुरु झाली. काही वेळाने संभाजीराजे छत्रपती गडाखाली आल्यानंतर त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हिंसक जमावाने घरं पेटवून देत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या सगळ्या प्रकारावरुन खासदार शाहू छत्रपती यांना नाराजी व्यक्त केली.  हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असल्याचा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यानंतर प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच असल्याचे शाहू छत्रपती यांनी म्हटलं.

"शाहू महाराजांच्या नगरीत अशा प्रकारची घटना दुसऱ्यांदा होणे म्हणजे यात काही षडयंत्र नक्की आहे. त्याला आपल्याला यापुढे तोंड द्यावे लागणार आहे. हे प्रशासनानचे अपयश आहे. शासनाने आधीच आदेश दिला असता तर ही घटना घडली नसती. सरकारने तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे. प्रशासनाने कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण हटवलं असेल तर चांगलेच आहे. अतिक्रम हटवण्याच्या नावाखाली जी हिंसा झाली त्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे यांच्या संवाद व्हायला उशीर झाला," असे खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

"विशाळगडवर झालेला हिंसाचार म्हणजे प्रशासनाचे अपयश आहे , असं सांगत संभाजीराजेंनीही यावर भूमिका घेताना थोडा विचार करायला हवा होता. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा का होऊ दिली जात नाही, हे सर्व घडायचं शासन वाट पाहत होतं का?," असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.

Web Title: MP Shahu Maharaj Chhatrapati clarified his stance on the Vishalgad violence case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.